डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी! विद्युत वितरण कंपनीत ५ हजारहून अधिक जागांसाठी मेगा भरती सुरू

 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत ५३४७ पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया विद्युत सहाय्यक पदासाठी आहे.



पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. हा अर्ज कसा भरायचा, अर्ज भरण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, पगार याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि विशेषत: १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. ज्यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत काम करायची इच्छा आहे, त्यांनी आजच अर्ज करा.


पदाचे नाव - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदासाठी अर्ज मागविले आहे.


पदसंख्या - विद्युत सहाय्यक पदासाठी एकूण ५३४७ जागा रिक्त आहेत. खालील प्रमाणे या रिक्त जागांचे विभाजन करण्यात आले आहेत.

  • अनुसूचित जाती – ६७३
  • अनुसूचित जमाती – ४९१
  • विमुक्त जाती (अ)- १५०
  • भटक्या जाती (ब) – १४५
  • भटक्या जाती (क) – १९६
  • भटक्या जाती (ड) – १०८
  • विशेष मागास प्रवर्ग – १०८
  • इतर मागास प्रवर्ग – ८९५
  • ईडब्ल्यूएस – ५००
  • अराखीव – २०८१
वयोमर्यादा - पात्र उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे असावे.

शैक्षणिक पात्रता – पात्र उमेदवार १२ वी पास असावा.

परीक्षा शुल्क -

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी - 
रु. २५० + GST
मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी - 
रु. १२५ + GST

अर्ज पद्धती - ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २० मार्च २०२४

पगार –

  • प्रथम वर्ष- १५,०००/- रुपये
  • द्वितीय वर्ष - १६,०००/- रुपये
  • तृतीय वर्ष- १७,०००/- रुपये
अधिकृत वेबसाईट - https://www.mahadiscom.in/ सविस्तर माहितीसाठी या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.

अर्ज कसा करावा?

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा. त्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर दिलेली माहिती सविस्तर वाचावी.
तारखेपुर्वी नीट अर्ज भरावा.
अर्ज भरल्यानंतर परिक्षा शुल्क भरावी.

News Credit:
लोकसत्ता 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक