डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

फोटोमॅथ ॲप

शाळा असो किंवा कॉलेजचे विद्यार्थी असो, त्यांचा गणित हा विषय डोक्यावरून जातो. एकदा ही भावना डोक्यात पक्की झाली की, मग ती दूर करणे कठीण जाते. त्यामुळे विद्यार्थी गणितप्रेमी कसे होतील ही गणिताच्या शिक्षकापुढे नेहमीची समस्या असते.

तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण गूगल फोटोमॅथ (Photomath) ॲप वापरकर्त्यांसाठी घेऊन आला आहे. हे एक स्मार्ट कॅमेरा कॅलक्युलेटर आणि गणित सहाय्यक ॲप आहे, जे तुम्हाला फक्त फोटोच्या मदतीने समीकरणे सोडवण्यास मदत करेल. भूमिती असो वा बीजगणित, हे ॲप तुम्हाला स्टेप बाय स्टेप गणितं समजून घेण्यास मदत करेल.


गूगलने अधिकृतपणे मार्च २०२३ मध्ये फोटोमॅथ ॲप विकत घेतले होते. पण, याची पहिली घोषणा मे २०२२ मध्ये करण्यात आली होती. या सुरुवातीच्या घोषणेनंतर आणि नियमांच्या मंजुरींचे पालन केल्यानंतर आता हे ॲप जगभरातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. वापरकर्ते फक्त गणिताच्या समीकरणाचा फोटो काढून ते सोडवण्यासाठी स्टेप बाय स्टेप स्पष्टीकरण मिळवू शकतात. या नवीन ॲप इंटिग्रेशनसह गूगल शैक्षणिक पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. गणित विषय शिकणे आणि गणित विषयातील अनेक समस्या सोडवणे सोपे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेत गूगल हा नवीन ॲप वापरकर्त्यांसाठी घेऊन आले आहे.

फोटोमॅथ ॲप कसे वापरावे?

  • अँड्रॉइड डिव्हाइस असणाऱ्या युजर्सनी प्ले स्टोअर ॲप ओपन करा.
  • फोटोमॅथ ॲप सर्च करा व तो डाउनलोड करा.
  • ॲप ओपन करा. त्यानंतर तुम्हाला जे गणित सोडवायचे आहे, तिथे तुमच्या फोनचा कॅमेरा धरा. तुमचे गणित फ्रेममध्ये स्पष्टपणे कॅप्चर झाले आहे ना याची खात्री करून घ्या.
  • स्कॅनिंग करणे शक्य नसल्यास तुम्ही गणित टाईप करण्यासाठी की-बोर्डदेखील वापरू शकता.
  • एकदा तुम्ही गणित (समीकरणे) स्कॅन किंवा टाइप केलं, त्यानंतर फोटोमॅथ त्यावर प्रक्रिया करेल आणि काही उपाय सुचवेल.
  • तुम्हाला गणिताच्या पायऱ्यांनुसार (स्टेप बाय स्टेप) स्पष्टीकरण दिले जाईल. 
विशेष म्हणजे फोटोमॅथ हा ॲप बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, सांख्यिकी आणि कॅलक्युलेटरसह गणिताचे विविध विषय हाताळू शकते. वापरकर्त्याच्या अनुभवासाठी इथे अनेक भाषादेखील आहेत. याव्यतिरिक्त समीकरणे सोडवण्यासाठी जाहिरात मुक्त प्रवेशसारख्या अतिरिक्त फीचर्सचा वापर करण्यासाठी वापरकर्ते फोटोमॅथ प्लसचे सदस्यत्व घेऊ शकतात. ॲप वापरण्यासाठी विनामूल्य आहे. पण, अतिरिक्त पाठ्यपुस्तक उपाय, ॲनिमेटेड ट्यूटोरियल आणि मासिक किंवा वार्षिक परीक्षेसाठी सखोल स्पष्टीकरण यांसारख्या अतिरिक्त फीचर्ससह पर्यायी फोटोमॅथ प्लस सबस्क्रीप्शन उपलब्ध आहे. तसेच गूगलच्या इकोसिस्टममध्ये अधिक सुविधा प्रदान करण्याच्या हेतूने फोटोमॅथमधील विशिष्ट फीचर्स कालांतराने गूगल लेन्स (Google Lens) आणि गूगल सर्च (Search) मध्ये एकत्रित केली जाण्याची शक्यता आहे.

News Credit:
लोकसत्ता 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक