डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हेच आहे सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात.

 तुम्ही अनेकदा हे ऐकले असेल की मद्यपान न केल्यामुळे तुमच्या आतड्याचे आरोग्य सुधारते. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, मद्यपान कमी करणे किंवा मद्यपान न करणे हेच तुमच्या आरोग्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जादूसारखे काम करणारे, सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य आहे.


जर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेत असाल आणि फॅट्स कमी करण्याच्या प्रयत्न करत असाल, तर मद्यपान कमी केल्यास शरीराचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल. मद्यपान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी निर्जलीकरणामुळे आणि हँगओव्हरमुळे शरीरावर विपरित परिणाम होतो हे लक्षात ठेवा", असे पोषण प्रशिक्षक ब्रॅड जेन्सन इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

जेन्सन यांच्या मते, “जरी तुम्ही सध्या जास्त मद्यपान करत असाल आणि आता दर आठवड्याला एक ते दोन ग्लास मद्य पिण्याचे ठरवले, तरीही ते तुमच्यासाठी आश्चर्यकारक लक्ष्य असेल.आरोग्यासाठी चांगले असे कोणतेही मद्य नाही. शिवाय अनेकांना मद्य प्यायल्यानंतर घेतलेले निर्णय आवडत नाहीत.

याबाबत सहमती दर्शवत, द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, मुंबईच्या परेल येथील ग्लोबल हॉस्पिटल्सच्या ॲडल्ट हेपॅटोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटचे क्लिनिकल लीड एचओडी, डॉ. अमित मांडो यांनी सांगितले की, मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हे फिटनेस गेम चेंजर आहे.”

मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हे फक्त एक फिटनेस हॅक नाही, ही एक परिवर्तनशील जीवनशैलीची (Transformative Lifestyle) निवड आहे, जी उत्तम आरोग्य आणि आरोग्याच्या तुमच्या प्रवासावर खोलवर परिणाम करू शकते. मद्यपान पूर्णपणे बंद केल्यास तुम्ही केवळ तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी करत नाही, तर तुम्ही तुमची झोप गुणवत्ता, शरीरातील पाण्याची पातळी आणि पौष्टिक मूल्यांचे सेवनदेखील वाढवत आहात," असे पालघरमधील अधिकारी लाइफलाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे, सल्लागार फिजिशियन, डॉ. दीपक पाताडे यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

मद्याच्या कॅलरी घनतेकडे अनेकदा लक्ष दिले जात नाही, ज्यामुळे वजन वाढण्यास आणि आरोग्याच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होतो. डॉ. पाताडे म्हणाले की, “शारीरिक फायद्यांव्यतिरिक्त मद्यपान कमी केल्याने मानसिक स्पष्टता आणि लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.

मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे मद्यपान बंद करणे तुमच्या आरोग्याला कशी मदत करते, ते येथे पाहा.


डॉ. अमित मांडो सांगतात:

आतड्याचे आरोग्य सुधारते : मद्याचे चयापचय होताना यकृतावर ताण येतो, ज्यामुळे सूज येणे किंवा दाह निर्माण होतो आणि नुकसान होऊ शकते. मद्य पूर्णपणे बंद करून तुम्ही तुमच्या यकृताला बरे होण्याची आणि चांगल्या पद्धतीने कार्य करण्याची संधी देता.

कॅलरी नियंत्रण : अल्कोहोलयुक्त पेये अनेकदा आवश्यक पोषक तत्त्वे न पुरवता अतिरिक्त कॅलरी शरीरामध्ये सोडतात. "मद्यपान न केल्यास तुम्ही केवळ कॅलरीजचे प्रमाण कमी करत नाही, तर एकूणच आरोग्यासाठी भरपूर पोषक तत्व असलेल्या पदार्थांसाठी शरीरामध्ये जागा बनवता."

शरीरातील पाण्याची पातळी : मद्यपानामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, ज्याला निर्जलीकरण म्हणतात. पुरेश्या प्रमाणात शरीरातील पाण्याची पातळी राखणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. “मद्यपान कमी केल्याने शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते, तुमच्या कसरत कार्यक्षमतेला आणि पुनर्प्राप्तीस समर्थन मिळते", असे डॉ. मांडो म्हणाले.

झोपेची गुणवत्ता सुधारते : मद्य प्यायल्यास शांत झोपेमध्ये अडथळा निर्माण होतो. “मद्यपान पूर्णपणे बंद केल्यास तुम्ही तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढवता, स्नायूंना बरे होण्यासाठी आणि एकूणच आरोग्याला चालना देता.”

आणखी काय लक्षात ठेवावे?

दुखापतीचा धोका कमी : उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या डॉ. एकता सिंघवाल, एम.एस.सी. आहारतज्ज्ञ, यांच्या मते, “मद्यपानामुळे समन्वय, संतुलन आणि निर्णयक्षमता बिघडू शकते. शारीरिक हालचाली किंवा व्यायामादरम्यान दुखापत होण्याचा धोका वाढतो.”

News Credit:

लोकसत्ता 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक