डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

भारतातील लठ्ठपणा ची समस्या

आपल्या समाजात अनेक महिला, पुरुष व  मुलं जाड किंवा लठ्ठ आहेत पण लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणं ही तेवढं च अवघड आहे . लठ्ठपणामुळे या सर्वांना इतर अनेक आजारांना सामोरे जावे लागते. भारतात लठ्ठपणा गंभीर आजार आहे. भारतात पंजाब, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये या विकाराचं प्रमाण सर्वाधिक आहे. 



आपल्या देशात लठ्ठपणा या विकाराने ग्रासलेल्या भारतीयांची संख्याही लक्षणीय आहे. पाच ते 19 वर्षांच्या 6 कोटी 30 लाख मुलांना लठ्ठपणा हा विकार आहे. 20 वर्षांवरच्या 15 कोटी 80 लाख व्यक्ती लठ्ठ आहेत. केरळमध्ये 65.4 टक्के तर पंजाबमध्ये 62.5 टक्के नागरिकांना लठ्ठपणा हा विकार आहे. दिल्लीत हे प्रमाण 59 टक्के तर एवढं आहे. तमिळनाडूत 57.9 टक्के नागरिक लठ्ठ आहेत.

लठ्ठपणाचा संबंध केवळ वजनाशी नसून संपूर्ण आरोग्याशी आहे. लठ्ठ व्यक्तींना अनेक गंभीर आजार असतात किंवा होऊ शकतात. उच्च रक्तदाब, हृदयरोग, श्वसनविकार, मधुमेह, चयापचयाच्या समस्या, तसंच मानसिक विकारही या व्यक्तींमध्ये आढळण्याची शक्यता असते. त्यामुळेच नियमित व्यायाम, चौरस आहार आणि विश्रांती यांचा दिनचर्येत समावेश करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

सर्व वयोगटातल्या व्यक्तींनी लठ्ठपणा टाळण्यासाठी आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. अतिरिक्त मैदा, फॅट, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, पाकिटांमधून आणि बाटल्यांमधून विकले जाणारे खाद्यपदार्थ आणि शीतपेयं यांचा आहारातला वाढलेला समावेश, कामाच्या ठिकाणी वाढलेल्या स्पर्धेमुळे निर्माण झालेले ताणतणाव अशा अनेक गोष्टी लठ्ठपणाला पूरक ठरतात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक