डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

आता महाप्रसादाच्या आयोजनासाठी ऑनलाईन परवानगी आवश्यक .

अन्न व औषध प्रशासनाचं एक मोठा निर्णय



गेल्या काही दिवसांपासून महाप्रसादातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. महाशिवरात्री निमित्ताने देखील अशाप्रकारे भंडारा, महाप्रसादाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येणार असल्याने अन्न व औषध प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रत अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून 200 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. तसेच बुलढाणा  जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर जेवणातून भगर आणि आमटी मुळे अंदाजे 450 ते 500 जणांना या जेवणातून विषबाधा झाली होती.

यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. आता महाप्रसादाचे आयोजन करायचे असल्यास त्याबाबतची नियमावली अन्न व औषध प्रशासनाने जारी केली आहे.


महाप्रसाद कार्यक्रमासाठी ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक

महाप्रसादाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी शंभर रुपये शुल्कासह ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे. तपासणीसाठी प्रशासनाची पथके देखील तयार करण्यात आली आहेत. नियमांचे पालन न केल्यास अन्न, सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.


मार्गदर्शक सूचना :

  • वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करा.
  • शुद्ध पाण्याचा वापर.
  • कच्चे अन्नपदार्थ नोंदणीकृत परवानाधारकांकडूनच खरेदी करा.
  • महाप्रसाद बनवताना योग्य ती खबरदारी घ्या.
  • कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्या.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक