डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

SBI Credit Card वापरकर्त्यासाठी महत्वाची बातमी, कार्डच्या नियमांमध्ये झाले हे बदल

खिशात पैसे नसतील आणि अचानक पैशांची गरज भासली की अनेकजण क्रेडिट कार्ड वापरतात. पैशांची कमतरता असताना एखादी वस्तू ताबडतोब विकत घ्यायची गरज पडल्यास किंवा अचानक पैशांची गरज भासल्यास सर्वात आधी आपण क्रेडिट कार्डचा विचार आपण करतो.



अचानक येणाऱ्या खर्चाला तोंड देण्यासाठी क्रेडिट कार्ड खूप फायदेशीर ठरते. 

परंतु कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड वापरताना आपण त्या क्रेडिट कार्डचे नियमही लक्षात ठेवले पाहिजेत. आता अलीकडेच भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांक बदल केले आहेत. एसबीआयचे हे नवीन नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे तुम्हीही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला या नियमांची माहिती असणं आवश्यक आहे.


SBI ने क्रेडिट कार्डच्या नियमांत केले हे बदल

किमान रक्कम: आता तुमच्या क्रेडिट कार्डवरील किमान रक्कम खालीलप्रमाणे मोजली जाईल - एकूण GST + EMI रक्कम + 100% फीस आणि चार्ज + 5% वित्त शुल्क + किरकोळ खर्च / रोख पैसे काढण्याची रक्कम + ओव्हरलिमिट रक्कम. हा नियम 15 मार्च 2024 पासून लागू होणार आहे.


भाड्यावर रिवॉर्ड: पूर्वी तुम्हाला एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून भाडे भरल्यावर रिवॉर्ड पॉइंट मिळायचे पण आता असे होणार नाही. बँकेने आता काही क्रेडिट कार्डसाठी ही सुविधा बंद केली आहे.


सदस्यत्व मिळेल : 16 ऑगस्ट 2023 पासून एसबीआय बँक AURUM क्रेडिट कार्ड ग्राहकांना क्लब मॅरियटच्या सदस्यत्वासोबतच लाइव्ह मिंट आणि द वॉल स्ट्रीट जर्नलच्या डिजिटल आवृत्त्यांचेही सदस्यत्व मिळेल.


2000 रुपयांचे व्हाउचर: बँकेच्या नव्या नियमानुसार सिंपली क्लिक आणि सिंपली क्लिक ॲडव्हांटेज कार्डधारकांना 1 लाख आणि 2 लाख रुपयांच्या ऑनलाइन खर्चावर 2000 रुपयांचे क्लियरट्रिप आणि यात्रा ऑनलाइन व्हाउचर मिळतील.


किरायाच्या पेमेंटवर कर : जर तुम्ही 17 मार्च 2023 नंतर तुमच्या SBI क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरले असेल तर तुम्हाला व्यवहारावर लागू होणाऱ्या करांसह 199 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.

News Credit:

Times Now मराठी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक