डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? मग पाच गोष्टी लक्षात ठेवा

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) आज केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये वापरला जात आहे. UPI ची सुरुवात भारतातून झाली असली तरी हळूहळू संपूर्ण जग त्याचा स्वीकार करत आहे. UPI सर्वांपर्यंत पोहोचला आहे, पण त्यात अनेक समस्या आहेत.

पहिली समस्या म्हणजे पेमेंट अडकणे. अनेकवेळा बँकेचे सर्व्हर डाउन असल्याने तर कधी इंटरनेटमुळे पेमेंट अडकून पडते. आज आम्ही तुम्हाला UPI पेमेंटमधील काही समस्या आणि त्यांच्या उपायांबद्दल सांगणार आहोत. 

UPI पेमेंट लिमिट चेक करा 

UPI पेमेंट फेल होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे UPI पेमेंट लिमिट पूर्ण होणे हे आहे. हे दोन्ही बाजूंनी होऊ शकते. म्हणजेच जर तुमची पेमेंट मर्यादा देखील पूर्ण झाली असेल तर पेमेंट थांबवले जाऊ शकते.


बँक सर्व्हर इश्यू

UPI पेमेंट फेल होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे बँक सर्व्हर इश्यू. कोणत्याही बँकेचा सर्व्हर कधीही निकामी होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी, तुमच्या UPI आयडीशी एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट लिंक करून ठेवा. पेमेंट करताना काही अडचण आल्यास, तुम्ही बँक अकाऊंट बदलून लगेच पेमेंट करू शकता.


UPI पिन

तुम्ही UPI पिन चुकीचा टाकल्यास, पेमेंट अडकू शकते किंवा फेल होऊ शकते. अशा परिस्थितीत पिनचीही काळजी घ्या. तुम्ही पिन विसरला असल्यास, तो रीसेट करा.


इंटरनेट कनेक्शन

UPI पेमेंटसाठी इंटरनेट कनेक्शन खूप महत्वाचे आहे. इंटरनेट कनेक्शनमध्ये काही समस्या असल्यास तुमचे पेमेंट थांबू शकते. फोनमध्ये सिग्नल कमी असल्यास पेमेंट करू नका किंवा कोणाकडून हॉटस्पॉट घेऊन पेमेंट करू नका.

News Credit

सकाळ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक