डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

आंबा खरेदी करताना गोड व रसाळ कसा ओळखावा?

कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यामुळे आंबे घेताना आपण काळजीपूर्वक आणि पारखून घेणे खूप गरजेचे आहे. 

कृत्रिमरीत्या पिकवणारे आंबे हे कॅल्शियम कार्बोइडच्या माध्यमातून पिकवतात. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर कच्चे आंबे विकत घेतले, आणि घरी आणून ते वाळलेले गवत, पालापाचोळा, झाडांची पाने, वर्तमानपत्रांच्या कागदामध्ये ठेवले, तर ते आंबे घरच्या घरी पिकवता येतात.

रंगापेक्षा सालीवरून ओळखा

जेव्हा केव्हा तुम्ही आंबा खरेदी करता, तेव्हा त्याच्या रंगापेक्षा सालीकडे जास्त लक्ष द्या. जर तो आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला असेल, तर त्या आंब्याच्या सालीवर एकही डाग नसतो. परंतु तो आंबा जर नैसर्गिकरित्या पिकवलेला नसेल, तर त्यावर काळे डाग दिसतात. त्यामुळे रंगावरून योग्य आंबा ओळखता येतो.

देठांवरून आंबा ओळखा

तुम्ही घेतलेला आंबा हा गोड आहे. हे त्याच्या देठावरून ओळखू शकता. यासाठी आंबा खरेदी करताना त्याचा देठाचा भाग नीट तपासा. दाब दिल्यास किंवा बाकीचा भाग फुगीर आणि मऊ असल्यास आंबा पूर्णपणे पिकलेला आहे आणि ताजा गोड असतो.

वासावरून ओळखा

आंबा खरेदी करण्यापूर्वी त्याच्या वासावरून ओळखा. पिकलेले गोड आंबे ओळखण्यासाठी ही फार जुनी पद्धत आहे. त्या आंब्याच्या देठाचा जर वास येत असेल, तर तो आंबा खूप गोड आणि मधुर असतो. तसेच हा आंबा नैसर्गिक रित्या पिकवलेला देखील असतो.

आंबा दाबून तपासा

अनेक वेळा बाहेरून आंबे पिकलेले असतात. परंतु आतून ते कच्चे असतात. त्यामुळे आंबा दाबून तपासा आंबा दाबल्यावर तो जास्त घट्ट नसावा. त्याचप्रमाणे जास्त चपटा देखील नसावा. आतून पिकलेला आंबा हा बाहेरून कच्चा असू शकतो. त्यामुळे आंबा खरेदी करताना तो दाबून पहा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक