'या' व्यक्तीनी पपयी खाणे आजच बंद करा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
किडनी स्टोन
ज्या व्यक्तींना किडनी स्टोन आहे अशा व्यक्तींनी पपयी खाऊ नये, असा सल्ला डॉक्टर देखील देतात. पपयीमध्ये व्हिटॅमीन सी असतं. किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी पपयी खाल्ल्याने त्यांचा किडनी स्टोन आणखी वाढण्याची शक्यात असते. यासह पपयीमध्ये कॅल्शियम ऑक्सालेट देखील असते. अशावेळी तुम्हाला किडनी फेल होण्याची समस्या देखील होऊ शकते.
गर्भवती महिला
गर्भवती महिलांसाठी पपयी फार घातक आहे. कदाचीत त्याने बाळाच्या जिवाला देखील धोका होऊ शकतो. पपयी खाल्ल्याने यूटेरस कॉन्ट्रेक्शन सुरु होऊ शकतं. काही प्रकरणात पपयीचे सेवन केल्याने त्या महिलेची प्रसुती वेळेआधीच होण्याची शक्यता असते. असे झाल्यास बाळाची वाढ पूर्ण झालेली नसते. त्यामुळे बाळासह मातेच्या जीवाला धोका निर्माण होतो.
हृदयविकाराने ग्रस्त व्यक्ती
ज्या नागरिकांना हृदयाशीसंबंधीत आजार आहेत त्यांच्यासाठी देखील पपयी काही प्रमाणात घातक मानली जाते. पपयीत असे काही घटक असतात ज्याने हृदयाचा आजार असल्यास हृदयाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी सावधानतेने पपयी खाणे टाळले पाहिजे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा