डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

एक वर्षाच्या आतील मुलांना 'हे' पदार्थ देऊ नयेत

बाळासाठी सहा महिन्यानंतरचा आहार हा नवीन असतो. त्यामुळे नवीन चव म्हणून मुलं तुम्ही देईल खात पित असतात. पण त्यांची पचनशक्ती पूर्ण विकसित झालेली नसते. यामुळे बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याला कोणत्या गोष्टी खायला देऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे.कारण काही पदार्थ पचवणे त्यांना कठीण जाते त्यामुळे मुलांना उलट्या जुलाब होऊ लागतात. यामुळे त्यांना काय खाण्यास द्यावे यापेक्षा का देऊ नये हे लक्षात घ्यावे.

गायीचे दूध

गायीचे दूध हे आपल्या आरोग्यासाठी वरदान आहे. याचे अनेक आरोगयदायी फायदे आहेत. पण मुलांच्या बाबतीत मात्र गायीचे दूध अपेक्षित परिणाम देऊ शकत नाही. कारण गायीच्या दूधात प्रथिने असतात. पण जर मुलाचे वय एक वर्षापेक्षा कमी असेल. तर हे दूध पचवणे मुलाच्या पचनसंस्थेसाठी कठीण काम असते. त्यामुळे मुलाला पोट फुगणे, पोटदुखी आणि गॅस सारख्या समस्यांचा त्रास होतो.


चॉकलेट

लहानांपासून मोठ्यांपर्यंत चॉकलेट सगळ्यांना आवडतं. पण लहान बाळाला चॉकलेट देऊ नये. पण एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना चॉकलेट खाऊ घातल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.


आंबट फळे

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण व्हिटॅमिन सी समृद्ध आंबट फळ खातो. पण हे व्हिटॅमिन सी आणि ॲसिड मुलांच्या पोटात जाऊन त्यांचे पोट खराब करते. त्यांना अतिसाराचा त्रास होऊ शकतो.


मध

एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मध खायला देऊ नये. नवजात मुलांचे आतडे फार नाजूक असते. ते मध पचवण्यास सक्षम नसते.यामुळे मुलांना मध पाजल्यावर क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम नावाच्या जीवाणूंची संख्या वाढते. हा जीवाणू मुलांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे मुलांचे स्नायू कमकुवत होतात, त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि त्यांचे स्नायूही टोन होत नाहीत.


गहू

गव्हामध्ये ऍलर्जीन असल्यामुळे, गव्हापासून बनविलेले पदार्थ सामान्यतः लहान मुलांना, विशेषत: एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना दिले जात नाहीत. गव्हात ग्लूटेन असते, जे पचायला सोपे नसते. हेच कारण आहे की जेव्हा मुले घन पदार्थ खायला लागतात तेव्हा त्यांना प्रथम तांदळाचे पदार्थ खायला दिले जातात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक