डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

नैसर्गीक प्रसूतीसाठी सायन मॉडेल

 अलिकडे सर्वत्र सिझेरीयन प्रसुतींची संख्या वाढत चालली आहे. मात्र नैसर्गीक प्रसूती व्हावी, अशी इच्छा सर्वांची असते. प्रसूती कळा सहन करण्याची क्षमता नसणे किंवा जोखीम नको म्हणून सिझेरीयनचा पर्याय स्वीकारण्याचा कल बहुतांश जोडप्यांचा असतो; मात्र आता सायन रुग्णालयाने नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी एक मॉडेल तयार केले आहे.

या मॉडेलच्या अंमलबजवणीमुळे सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण कमी होत आहे. तर नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण ७५ ते ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

डॉ. निरंजन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सायन मॉडेल तयार केले आहे.


काय आहे मॉडेल

मुख्य सी-सेक्शन दर लक्षणीयरित्या कमी करण्यात मदत करते. गर्भवतीच्या मांडीवर २४ फ्रेंच फॉलीज कॅथेटर लावला जातो. ते गर्भाशयाच्या प्रवेशद्वारावर जोडले जाते. त्यानंतर कॅथेटरचा दबाव वाढवल्याने प्रवेशद्वार प्रसरण पावते. यामुळे बाळ बाहेर यायला मदत होते. या पद्धतीने प्रसूतीची प्रक्रिया पार पाडली जाते; मात्र या पद्धतीत गर्भवतीतेला तीव्र वेदना होतात. तसेच सिझेरीयनमुळे महिलेला भविष्यात त्रास होतो. सायन मॉडेल हे कॅलिफोर्निया मॅटर्नल क्वालिटी केअर कोलॅबोरेटिव्ह जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या टुलकिटच्या वापरातून सिझेरीयन करणाऱ्यांची संख्येत ५ ते ६ टक्के घट झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.


अशी केली जाते तयारी

रुग्णालयात आलेल्या गर्भवती महिलांचे आम्ही सर्वेक्षण केले. १३१ जणींपैकी किती लोकांना नैसर्गिक प्रसूती हवी आहे, हा प्रश्न विचारला. त्यावेळी ८० ते ८५ टक्के जणांनी नैसर्गिक प्रसूती हवी असल्याचे सांगितले. सिझर केलेल्या ६५ टक्के जोडप्यांनी नैसर्गिक प्रसूतीचा पर्याय निवडला. गर्भधारणा झाल्यापासून ९ महिन्यापर्यंत विविध टप्यात आम्ही गर्भवती महिला, तिचे पती, जवळच्या नातेवाईकांचे समुपदेशन करतो. चांगला डायट तसेच इतर सूचना करतो. त्यांच्या शंका-कुशंकचे निवारण करतो. नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक व्यायाम करण्यास सांगतो. नैसर्गिक प्रसूतीसाठी त्यांची परवानगी आम्ही घेतो असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. पुढील पाच वर्षात हे मॉडेल सर्वत्र लागू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मॉडेलमुळे आम्ही नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढवण्यात मदत झाली आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक