डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

विलायती चिंचे पासून प्रक्रियायुक्त पदार्थ

विलायती चिंचेची लागवड प्रामुख्याने राजस्थानमधील अजमेर, उदयपूर आणि माउंट अबू जिल्ह्यात आहे. फळांमधील गर लाल आणि पांढऱ्या रंगाचा असतो.

बिया काळ्या रंगाच्या असतात. या चिंचेला सामान्यतः पहाडी चिंच म्हणून ओळखले जाते. हे झाड सदाहरित असून, वीस मीटर उंचीपर्यंत वाढते. प्रत्येक शेंगेमध्ये सुमारे दहा बिया असतात. विलायती चिंचेमध्ये आवश्यक पोषक तत्त्वेदेखील असतात. हे फळ अतिसारावर उपचार, दात मजबुतीकरण आणि मधुमेह असलेल्यांमध्ये रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. विलायती चिंचेमध्ये ऊर्जेची गरज, भूक नियंत्रण आणि शरीरातील अन्नाचे पचन सुधारण्यासाठी कॅलरी, प्रथिने, जटिल कर्बोदके आणि आहारातील तंतू असतात. कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जीवनसत्त्व क आणि ब उपलब्ध आहे. याचबरोबरीने अँटिऑक्सिडन्ट, फिनोलिक संयुगे, फ्लेव्होनॉइड्स आणि क्वेरसेटीन उपलब्ध आहे. यामध्ये प्रथिने, सॅपोनिन्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनॉलसारखी फायटोकेमिकल्स उपलब्ध आहेत.

पौष्टिक घटक 
१) कर्बोदके -७६.८७ ग्रॅम
२) प्रथिने -१२.४ ग्रॅम
३) तंतुमय घटक - १.३ ग्रॅम
४) चरबी - ०.२४ ग्रॅम
५) पोटॅशिअम - ०.२ ग्रॅम
६) फॉस्फरस -०.०४ ग्रॅम
७) कॅल्शिअम - ०.०१ ग्रॅम
८) लोह - ०.००५ ग्रॅम

प्रक्रियायुक्त पदार्थ

१) ताजी फळे ः ताज्या फळांमध्ये थोडी साखर आणि मीठ मिसळून खाता येते.

२) वाळलेली फळे : वाळलेल्या फळांची पावडर बनवतात. गोड आणि चवदार पदार्थांसाठी चव म्हणून वापरतात. पावडर पाण्यात भिजवून नंतर पेस्ट बनवतात.

३) पेय : वाळलेल्या शेंगा रात्रभर पाण्यात भिजवून गोड चिंचेचे पेय बनवता येते. यामध्ये थोडी साखर मिसळावी लागते.

४) चटणी : भिजवलेल्या चिंचेमध्ये गूळ मिसळून त्यामध्ये आले, हिरवी मिरची, मीठ मिसळावे.

५) करी : पदार्थाला तिखट चव येण्यासाठी वेगवेगळ्या करीमध्ये चिंचेची पेस्ट वापरली जाऊ शकते.

६) मिठाई : चिंचेची पेस्ट आइस्क्रीम, जॅम इत्यादी विविध मिठाईमध्ये वापरली जाते.

डॉ. सचिन मस्के,

(एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक