डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

रियल इस्टेट अथवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल व भविष्यकाळात चांगला परतावा मिळवायचा असेल तर

काही वर्षांपासूनचा विचार केला तर रियल इस्टेट म्हणजेच प्रॉपर्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा ट्रेंड आपल्याला वाढताना दिसून येत आहे.

तुम्हाला जर रियल इस्टेट अथवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल व भविष्यकाळात चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्हाला अशी प्रॉपर्टी खरेदी करण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. नाहीतर नफा मिळण्याऐवजी तोटा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून निवासी किंवा व्यावसायिक मालमत्तेची खरेदी करत असाल तर काही मूलभूत गोष्टी पाहणे गरजेचे आहे.

1- चांगल्या ठिकाणच्या मालमत्तेची खरेदी करणे–

तुम्हाला जर घर किंवा दुकान, प्लॉट खरेदी करायचा असेल तर तो योग्य ठिकाणी असणे गरजेचे आहे. जर सदर मालमत्ता चांगल्या आणि योग्य ठिकाणी असेल तरच त्याच्या किमतीत काळानुरूप वाढ होत असते. एखाद्या झोपडपट्टीच्या जवळ प्रॉपर्टी खरेदी करणे टाळा.

तसेच तुम्ही अशा प्रकारचे मालमत्ता घेत असाल त्या ठिकाण पासून हॉस्पिटल, शाळा आणि बाजारपेठ यासारखे महत्त्वाची ठिकाणे किती अंतरावर आहेत याची देखील खात्री करा. तसेच तुम्हाला ज्या परिसरामध्ये अशी मालमत्ता विकत घ्यायची असेल त्या अगोदर त्या ठिकाणी रियल इस्टेट बाजारातील ट्रेंड कसा आहे म्हणजे त्या ठिकाणी तेजी आहे की मंदी इत्यादी गोष्टी पाहूनच निर्णय घ्यावा.

2- मूलभूत सुविधांची पाहणी–

तसेच ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायचे असेल त्या ठिकाणी पाणी आणि विज यासारख्या महत्त्वाच्या सुविधा व त्यासोबतच सांडपाणी सारख्या सुविधांची उपलब्धता आहे का याची नक्की माहिती करून घ्यावी.

मुल आणि ज्येष्ठांसाठी आवश्यक असलेली उद्याने, शॉपिंग सेंटर, हॉस्पिटल आणि शाळा सारख्या सुविधा किती अंतरावर आहेत? हे देखील पाहणे गरजेचे आहे. कारण या सुविधांमुळे सदर मालमत्तेचे मूल्य वाढण्यामध्ये खूप मोलाची मदत होते.

3- प्रॉपर्टीचे काही वाद आहेत का हे पाहणे– 

तुम्ही जी प्रॉपर्टी खरेदी करणार असाल त्या प्रॉपर्टीची कायदेशीर स्थिती काय आहे हे तपासून घेणे गरजेचे आहे. म्हणजेच त्या प्रॉपर्टीचे काही कोर्टात वाद वगैरे तर सुरू नाहीत ना हे देखील पहावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आवश्यक परवानगी घेणे आवश्यक असून निर्विवाद मालमत्तेची विक्री करणे सोपे असले तरी त्याची किंमतही जास्त असते.

4- बिल्डरची प्रतिष्ठा पहावी– 

बिल्डरने बांधलेल्या एखाद्या गृहनिर्माण संस्थेमध्ये तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर संबंधित बिल्डरची प्रतिष्ठा कशी आहे हे तपासून पहावे. नेहमी अशा प्रकारचे प्रॉपर्टी खरेदी करताना प्रसिद्ध आणि नामांकित बिल्डरांनी विकसित केलेल्या गृहनिर्माण सोसायटीमध्येच मालमत्ता खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे.

5- गुंतवणूक करण्याआधी स्ट्रॅटेजी बनवावी– 

तुम्ही जेव्हा प्रॉपर्टी अर्थात रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर ती दीर्घकालीन गुंतवणूक असते. म्हणून तुम्ही आधीच यामधून बाहेर पडण्याची स्ट्रॅटेजी तयार ठेवावी.

म्हणजेच तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करून किती वर्षांनी प्रॉपर्टी विकणार हे अगोदरच ठरवून ठेवावे. तसेच तुम्हाला तुमच्या निर्धारित केलेल्या टार्गेट अगोदर प्रॉपर्टी विकायचे असेल तर तुम्हाला होणारा संभाव्य नफा किंवा तोटा विचारात घेणे गरजेचे असते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक