डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

कोणत्या वेळेत वर्कआउट करावा?

हेल्दी राहण्यासाठी वर्कआऊट अतिशय महत्त्वाचंआहे, हे आपण रोजच ऐकत असतो. कारण आपल्यापैकी अनेकजण फिटनेस फ्रिक असाल. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न देखील केले जातात.

फिट राहण्यासाठी कोणत्या वेळेतला (सकाळ किंवा संध्याकाळ) वर्कआउट जास्त फायदेशीर ठरतो. याकरता आम्ही एक्सपर्टचा सल्ला घेतला की, कोणत्या वेळेचा वर्कआऊट अधिक फायदेशीर ठरतो.

मॉर्निग वर्कआऊट का फायदेशीर?

मॉर्निंग वर्कआईट चयापचय वाढवते आणि मूड देखील सुधारतो? यासोबतच झोपेची गुणवत्ताही सुधारते. एक्सपर्ट सांगतात की, एखाद्या व्यक्तीने आपल्या आरोग्यासाठी आणि जीवनशैलीसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी शरीराचे संकेत ऐकले पाहिजेत. तुम्हाला दोन्ही वेळेला वर्कआऊट केल्यानंतर शरीरात होणारे बदल ओळखता आले पाहिजेत.

  • सकाळचा व्यायाम केल्याने मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर बाहेर पडतात. हे मनाला तीक्ष्ण करण्यास आणि इंद्रियांना सक्रिय करण्यास मदत करते आणि अनेक विकासात्मक कार्यांमध्ये उपयुक्त भूमिका बजावते. एवढेच नाही तर सकाळी व्यायाम केल्याने शरीर दिवसभर सक्रिय राहते.
  • सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने संध्याकाळच्या तुलनेत जास्त चरबी बर्न होते. कारण शरीरात साठलेली चरबी सकाळच्या व्यायामासाठी इंधन म्हणून वापरली जाते. अन्न खाल्ल्यानंतर, शरीर त्याचा ऊर्जा स्त्रोत म्हणून वापर करते.
  • व्यायाम केल्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्याला आनंदी हार्मोन्स देखील म्हणतात. आता जर तुम्ही सकाळी व्यायाम केला तर हे हार्मोन्स दिवसभर तुमचा मूड चांगला ठेवतील. परिणामी, तुम्ही दिवसभर तुमच्या कामात लक्ष केंद्रित आणि सतर्क राहाल.
  • एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक सकाळचे वर्कआउट करतात ते दैनंदिन व्यायामाचे पालन अधिक गंभीरपणे करू शकतात.
  • NCBI ने प्रकाशित केलेल्या संशोधनात असे नमूद केले आहे की जे लोक सकाळी लवकर उठतात आणि व्यायाम करतात त्यांना रात्री चांगली झोप येते.
संध्याकाळचा वर्कआऊट

संध्याकाळच्या वर्कआउटमुळे ऍक्टिवनेस सुधारतो आणि शरीराला ताकदही मिळते. संध्याकाळची कसरत केल्याने, एखादी व्यक्ती तणावमुक्त होते आणि त्याला दिवसभरातील आव्हानांपासून आराम मिळण्याची संधी मिळते. सामर्थ्य आणि लवचिकतेवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्यांसाठी संध्याकाळी व्यायाम अधिक फायदेशीर ठरू शकतो. तसेच काही लोकांना दिवस संपताना व्यायाम केल्यास थोडा थकवा जाणवू शकतो. अशावेळी दिवसा केलेला वर्कआऊट अतिशय उत्तम असतो.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक