डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

बायोसेन्सिंग उपकरण

 कॅन्सर, हृदयरोग, डायबेटीस रुग्णांवरील उपचार सहजसोपे व्हावेत, यासाठी गोरखपूर विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापक डॉ. तुलिका मिश्रा यांनी एक अनोखे उपकरण तयार केले आहे. 'बायोसेन्सिंग' असे या उपकरणाचे नाव आहे.

या संशोधनाला नुकतेच ब्रिटनचे पेटंट मिळाले आहे.

डॉ. तुलिका मिश्रा या दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विद्यापीठात वनस्पती विज्ञान विभागात सहायक प्राध्यापक आहेत. सध्याच्या काळात लोकांची जीवनशैली बदलली आहे. त्याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. कॅन्सर, हदयरोग, मधुमेह याचे रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांवरील उपचारात उपयोगी पडेल, असे उपकरण डॉ. तुलिका मिश्रा यांनी तयार केलेय. रुग्णांना कोणती औषधे द्यायची आणि कधी द्यायची, हे ठरवण्याची क्षमता या अनोख्या उपकरणात असेल. तसेच हृदयरोगाशी संबंधित आजारांची माहितीही सहजरीत्या मिळेल. डॉ. तुलिका मिश्रा यांच्या संशोधनावर ब्रिटनेही पेटंट देऊन मोहोर उमटवली आहे.

कसे केले संशोधन

मागील पाच वर्षांपासून डॉ. तुलिका मिश्रा यांनी विविध राज्यांतील नऊ संशोधकांसमवेत मोबाईल सेन्सिंग डिव्हाईसवर काम सुरू केले होते. वेगवेगळय़ा आजारांसाठी औषधीय वनस्पतींवर प्रयोग करत हे अनोखे उपकरण डिझाईन करण्याच्या दृष्टीने त्यांनी एक पाऊल पुढे टाकले. या यशानंतर त्यांनी 2021 मध्ये या उपकरणाचे पेटंट मिळवण्यासाठी अर्ज केला. आता डॉ. तुलिका मिश्रा यांच्या 'बायोसेन्सिंग' उपकरणाला पेटंट मिळाले आहे. 'पर्सनलाइज्ड मेडिसीन अॅण्ड फार्मोकोथेरपी'च्या सिद्धांतावर हे उपकरण डिझाईन करण्यात आले आहे.


असे करेल काम

'बायोसेन्सिंग' उपकरण हाताळणे एकदम सोपे असल्याचे डॉ. तुलिका मिश्रा यांनी सांगितले. उपकरणाला ब्ल्यू टुथ किंवा वायफायने कनेक्ट करून रुग्णाच्या शरीरात बायोसेन्सिंग केले जाते.याचे परिणाम स्क्रीनवर दिसतात. त्यामुळे रुग्णाला कोणते औषधे द्यायचे, हेदेखील ठरवता येईल. या उपकरणामुळे माणसाच्या शरीरातील एन्झाइम, हार्मोन्स आणि प्रोटीन यांचीदेखील माहिती मिळू शकते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक