डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

मॅटर्निटी इन्शुरन्स म्हणजे काय?

आजकाल कोणती समस्या कधी उद्भवेल काहीही सांगू शकत नाही. त्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास ऐनवेळी हॉस्पिटल आणि दवाखाने पाठी लागतात.


अशावेळी पैशांसाठी मोठी धावपळ लागते. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत नेमका किती पैसा लागेल याची काहीही शाश्वती नसते. अशावेळी आरोग्य विमा मोठी महत्वाची भूमिका पार पडतो. अचानक उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्येसाठी आरोग्य विमा मोठा फायदेशीर ठरतो.

मॅटर्निटी इन्शुरन्स म्हणजे काय? (Maternity Insurance)

मॅटर्निटी इन्शुरन्स म्हणजे 'मातृत्व विमा'. हा एक आरोग्य विम्याचा प्रकार आहे. हा विमा अनेक आरोग्य विमा देणाऱ्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिला जातो. जो महिलांच्या प्रसुतीच्या अगोदरचा आणि प्रसूतीनंतरचा खर्च काढण्यासाठी मदत करतो. काही कार्पोरेट कंपन्यासुद्धा आरोग्य विमा योजनांमधून महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसूती काळातील खर्चासाठी हा विमा प्रदान करतात. हा विमा एक ॲड ऑन इन्शुरन्स असतो. ज्याला तुम्ही सामान्य आरोग्य विम्यासोबतसुद्धा घेऊ शकता.


मॅटर्निटी इन्शुरन्सचे फायदे

महिलांच्या प्रसूती कालावधीतील खर्चासाठी हा विमा अत्यंत फायदेशीर ठरतो. प्रसूती कालावधीत येणारा खर्च वाचावा म्हणून हा ऍड ऑन इन्शुरन्स घेतला जातो. या विमा योजनेच्या माध्यमातून विमा देणारी कंपनी हॉस्पिटलची फी, वंध्यत्व उपचार, लसीकरण आणि काही प्रसंगी मूल दत्तक घेण्यासाठीचा खर्चसुद्धा उचलते.


इतकंच नाही तर, मॅटर्निटी इन्शुरन्स या विम्याच्या प्रकारात सरोगसीचा खर्चसुद्धा मिळतो. (Maternity Insurance)


याआधी कुठल्याही प्रकारचा आरोग्य विमा घेतल्यास तुम्हाला मॅटर्निटी इन्शुरन्सच्या कव्हरेजसाठी २ ते ४ वर्षाचा वेटिंग पिरियड दिला जात होता. मात्र, आता हा कालावधी ९ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या अंतर्गत महिलेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर कॅशलेस उपचार दिले जातात.

या विम्यामुळे आता कोणत्याही महिलेला प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता रोकड देण्याची गरज भासत नाही. (Maternity Insurance) यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर विमा कंपनीला विम्याची माहिती द्यावी लागते. शिवाय आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागतात. असे केल्यास प्रसूती कालावधीतील सर्व उपचार कॅशलेस स्वरूपात होतात.

मॅटर्निटी इन्शुरन्सच्या माध्यमातून नवजात बालकाच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून ते बाळ ९० दिवसाचे होईपर्यंत त्याचा सर्व खर्च केला जातो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक