पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक

इमेज
काही ठिकाणी धमकावून चोरी केली जाते. पण आता अशा घटना उघडकीस येत आहेत, ज्यामध्ये धमकी न देता, कोणतीही जबरदस्ती न करता व्यक्ती आपल्या जवळचे दागिने, पैसे अथवा मौल्यवान वस्तू चोरांना नेऊन देते. तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल, पण हे खरं आहे. बांगलादेशात चोरट्यांनी नवीन पद्धत वापरून लोकांना लुटणं सुरू केलं आहे. यात ते एखाद्या व्यक्तीकडे पत्ता विचारण्यासाठी किंवा इतर कारणाने जातात आणि त्यांच्याकडील सर्व दागिने आणि पैसे लांबवतात. विशेष म्हणजे ती व्यक्तीही आपल्या घरातलं मौल्यवान सामान स्वतः चोरट्यांना देते. चोर ते लुटून किंवा जबरदस्ती करून नेत नाही. चोरटे ज्या औषधाच्या मदतीने अशी गुन्हेगारी कृत्ये करत आहेत, त्याला शैतानी श्वास देखील म्हणतात. फसवणुकीची नवीन पद्धत मागच्या काही काळापासून बांगलादेशमध्ये एका औषधाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करून त्यांना लुटलं जात आहे. ज्यामध्ये कागद किंवा एखाद्या वस्तूवर औषध टाकून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिथून जाणाऱ्या लोकांच्या नाकाजवळ ते नेलं जातं. या वासाने काही सेकंदातच व्यक्तीचे भान हरपते. यानंतर तिच्याकडे ठेवलेले दागिने, पैसे किंवा कोणत्याही वस्तू मागित...

आता सातबारावरही लागणार आईचं नाव

इमेज
राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारी कागदपत्रांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यानंतर आता सातबारावर (Satbara Utara) अर्जदाराच्या नावानंतर आईच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे. याबाबत सूचना भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) दिल्या आहे. यामुळे आता सातबारा उताऱ्यावर आईचंही नाव दिसणार आहे.  भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, यापुढे सातबारावर आईचं नाव लागणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. हा नवा नियम एक मे २०२४ नंतर ज्या व्यक्तीचा जन्म होईल, अशा व्यक्तींसाठी लागू होणार आहे. नियमानुसार, एक मे २०२४ नंतर जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबारावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा समावेश होणार आहे.  तसेच पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेशाची येत्या सहा महिन्यांत अंमलबजावणी सुरू होणार आहे. दरम्यान, सध्याच्या काळात महिलांची नावे लावताना महिलेचे स्वतःचे नाव, पतीचे नाव आणि आडनाव असा क्रम आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावताना त्यांचे आधीचे म्हणजे लग्नापूर्वीच...

पांढऱ्या रेशनकार्ड धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

इमेज
श्वेत अर्थात पांढऱ्या रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले असून पांढरे रेशन कार्ड धारकांनाही महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. श्वेत शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यासाठी सर्व जिल्हापुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांना रेशन कार्डचे आधारशी जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये २०२३ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यानुसार, आरोग्य विमा योजनेचा लाभ हा शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांनाही देण्यात येणार आहे. पांढऱ्या शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्या...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक

'या' गोष्टी गुप्त ठेवा