आता सातबारावरही लागणार आईचं नाव
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारी कागदपत्रांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
यानंतर आता सातबारावर (Satbara Utara) अर्जदाराच्या नावानंतर आईच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे. याबाबत सूचना भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) दिल्या आहे. यामुळे आता सातबारा उताऱ्यावर आईचंही नाव दिसणार आहे.
भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, यापुढे सातबारावर आईचं नाव लागणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. हा नवा नियम एक मे २०२४ नंतर ज्या व्यक्तीचा जन्म होईल, अशा व्यक्तींसाठी लागू होणार आहे. नियमानुसार, एक मे २०२४ नंतर जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबारावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा समावेश होणार आहे.
तसेच पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेशाची येत्या सहा महिन्यांत अंमलबजावणी सुरू होणार आहे. दरम्यान, सध्याच्या काळात महिलांची नावे लावताना महिलेचे स्वतःचे नाव, पतीचे नाव आणि आडनाव असा क्रम आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावताना त्यांचे आधीचे म्हणजे लग्नापूर्वीचे नाव देखील लावण्याची मुभा असेल.
शहानिशा केल्यानंतरच होणार नोंद
कोणते पुरावे द्यावे लागतील? येत्या सहा महिन्यांत जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावासोबत त्याच्या आईचे नाव लावले जाणार आहे. त्यासंदर्भातील आवश्यक पुरावा दाखल केल्यानंतर त्याची तलाठ्यामार्फत शहानिशा केल्यानंतरच नोंद होईल.
साभार
सकाळ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा