जुना फोन विकताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आपण एखादा फोन 3 ते 4 वर्षे वापरला असेल तर त्या फोनमध्ये आपले अनेक डॉक्युमेंट्स आणि महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह असतात. फोन विकताना जर ह्या गोष्टी डिलीट केल्या नाही तर तुमच्या डेटा गैरवापर होण्याची शक्यता असते. सध्या अनेक गोष्टी आपल्याला डिजीटली उपलब्ध होतात. आपण कोणतीही डॉक्युमेंट्स सोबत घेऊन फिरण्यापेक्षा केवळ त्या डॉक्युमेंट्सचे फोटो आपल्या फोनमध्ये काढून ठेवतो. जेणेकरून आपण कोठे गेलो आणि आपल्याकडे ते डॉक्युमेंट्स नसेल तरी देखील आपल्या फोनमधील फोटोच्या मदतीने आपण त्या डॉक्युमेंट्सची प्रिंट काढू शकतो. तसेच आपण आपल्या बँकेचे व्यवहार देखील फोनवरून करतो. त्यामुळे एखादा फोन 3 ते 4 वर्षे वापरल्यानंतर त्या फोनमध्ये आपली सर्व माहिती जमा असते.
हा फोन दुसऱ्याला विकताना आपण जर ह्या सर्व गोष्टी फोनमधून डिलीट केल्या नाहीत तर आपल्या माहितीचा गैरवापर होऊन आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन फोन खरेदी करण्याची तयारी करत असाल आणि तुमचा जुना फोन विकायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅक्टरी रिसेट. तुम्ही तुमचा फोन दुसऱ्याला देणार असाल तर तो पूर्णपणे रिसेट करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वात आधी जुन्या फोनवरून नवीन फोनवर स्विच करताना, तुम्हाला तुमचा डेटा नवीन फोनमध्ये ट्रान्सफर करावा लागेल.
फॅक्टरी रीसेट तुमचे संपर्क, फोटो, व्हिडिओ,मॅसेज आणि अकाऊंटसह तुमचा सर्व वैयक्तिक डेटा डिलीट करते. तुमच्या फोनमध्ये डेटा जमा होतो ज्यामुळे त्यांचा वेग कमी होतो. फॅक्टरी रीसेट या समस्येचा उपाय आहे. असे केल्याने नवीन वापरकर्त्यांसाठी फोनची कार्यक्षमता सुधारते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा