डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

ITR फार्म भरतांना जेष्ठ नागरिकांनी हे नियम लक्षात ठेवा

 ज्येष्ठ आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी आखून दिलेले महत्त्वाचे नियम समजून घेणे, आवश्यक आहेत.

हे नियम समजले तर ज्येष्ठ नागरिकांची लाखो रुपयांची बचत होऊ शकते. लक्षात घ्या की, आयकर विभाग ज्येष्ठ नागरिकांना कर विवरणपत्र भरण्यासाठी एक विशेष प्राप्तिकर रिटर्न (ITR) फॉर्म प्रदान करते. ज्यामध्ये ते कर सूट मिळवू शकतात. हा फॉर्म ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.


ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाच्या श्रेणीनुसार आयटीआर फॉर्म भरावा लागतो. आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले पेन्शनधारक कर भरण्यासाठी ITR 1 वापरू शकतात. परंतु मालमत्ता, इतर स्रोत किंवा भांडवली नफा यातून उत्पन्न असणाऱ्यांनी ITR-2 चा पर्याय निवडला पाहिजे. व्यवसायातून कमावणाऱ्या पेन्शनधारकांनी ITR-3 किंवा ITR-4 फॉर्म भरावा.

कर मर्यादा - 

महत्वाचे म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांना 3 लाख रुपयांची मूलभूत मर्यादा आहे. तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादा 5 लाख रुपये आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत समाविष्ट असलेल्यांसाठी देखील मूळ मर्यादा 3 लाख रुपये आहे.


फॉर्म 16 - ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनच्या स्वरूपात उत्पन्न मिळत असेल तर त्यानंफॉर्म 16 भरण्याचा अधिकार आहे. फॉर्म 16 मध्ये त्यांच्या पगाराचे घटक समाविष्ट आहेत. यात त्यांच्या टीडीएसचीही माहिती असते. ज्येष्ठ नागरिक फॉर्म 26AS मध्ये सर्व माहिती असते.


फॉर्म 15H - 

जेव्हा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने मिळवलेले व्याज एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांच्या लागू मर्यादेपेक्षा जास्त असते तेव्हा बँका TDS कापतात. परंतु ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या बँकांना त्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असल्यास TDS कापून न घेण्याची विनंती करू शकतात. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बँकांमध्ये फॉर्म 15H भरावा लागतो.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'या' गोष्टी गुप्त ठेवा

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक