PM किसान सन्मान निधी योजनेच्या नावाखाली होतोय मोठा फ्रॉड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पंतप्रधान संबंधी योजनेच्या नावाखाली एक लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नये. असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आलेली आहे.
ही एक प्रकारची शेतकऱ्यांची फायबर फसवणूक केली जात आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर त्यानंतर शेतकऱ्याचा संपूर्ण मोबाईल आणि सिम कार्ड देखील हॅक होते. समोरील व्यक्ती मोबाईल्स आणि सिम कार्डचा ताबा घेतो. आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.अन्यथा त्यांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसू शकतो.
सध्या सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. परंतु आता शेतकऱ्यांबाबत देखील घडायला लागलेले आहेत. अशा प्रकारची कोणतीही फसवणूक जर शेतकऱ्यांची झाली असेल, तर त्यांनी 9330 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार दाखल करायची आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा