पोस्ट्स

डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

'या' गोष्टी गुप्त ठेवा

इमेज
  आपल्या जीवनातील काही गोष्टी सर्वांन पासुन गुपित ठेवा. आजकाल प्रत्येक व्यक्ती च्या जीवनात काही न काही समस्या असतात. या समस्या आपण आपल्या समाजातील लोकांना सांगून आपण आपले च हसे करुन घेत असतो. कारण समाजातील काही व्यक्ती आपल्या समस्या गंभीर होऊन ऐकतील व नंतर हसुन इतर लोकांना सांगत बसतील, या व्दारे समाजातील आपली प्रतिष्ठा व पत कमी होते. त्यामुळे आपल्या काही गोष्टी प्रत्येक व्यक्ती ने गुप्त ठेवल्या पाहिजे. आपली आर्थिक क्षमता:- प्रत्येक व्यक्ती ने आपल्या घर परिवारा ची आर्थिक क्षमते विषयी कधीही समाजातील व इतर लोकां समोर चर्चा करत बसू नये. त्यामुळे समाजातील लोकांना आपल्या विषयी एक प्रकारे अंदाज बांधता येऊ शकतो.  तुम्ही गरीब, श्रीमंत, किंवा मध्यमवर्गीय असा आपल्या आर्थिक परिस्थिती ची माहिती लोकांना देऊ नका. लोक या महिती चा गैर फायदा घेऊ शकतात. आपल्या परिवारातील अडचणी:- आजकाल प्रत्येक परिवारातील सदस्यां चे एकमेकांशी पटत नसते. आपल्या परिवारात अनेक अडचणी किंवा वाद विवाद असतात. या विषयी इतर लोकांशी बोलणं म्हणजे लोकांना आपल्या घरातील गोष्टी माहीत करुन देणे सारखे आहे. या गोष्टी तुमच्या साठी ...

रागावरील नियंत्रण

  Anybody can become angry - that is easy; but to be angry with the right person, and to the right degree, and at the right time, and for the right purpose, and in the right way - that is not within everybody's power and is not easy.' आत दबलीय निराशा, असुरक्षितता; व्यवस्थेविषयीचा, स्वत:विषयीचा राग. मग लाव्हा सारखा बाहेर येतो. क्रोधाच्या, आक्रमकतेच्या रूपात. तेल ओतायला आजूबाजूला सवंग करमणूक आहेच. विविध माध्यमांद्वारे सहज उपलब्ध असलेली, लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करणारी सवंग करमणूक आणि त्या भावनेचं शमन होण्यासाठी चुकीचे मार्ग, काहींच्या बाबतीत त्या भावना दाबाव्या लागणं, सुख मिळवण्याच्या चुकीच्या कल्पना. स्पर्धात्मक वातावरणाचा ताण आहेच. मग शिक्षण असो, नोकरी असो वा व्यवसाय असो. 'अपेक्षेप्रमाणेच सगळं मला मिळायला हवं आणि तेही ताबडतोब. खरं सुख भौतिक सुखातच आहे. मी ते मिळवीनच. दिलं तर सरळ, नाहीतर ओरबाडून. त्यासाठी मी आक्रमक व्हायलाच हवं. इतरांनी माझ्या मनासारखं वागायलाच हवं,' अशी मानसिकता आज दुर्दैवानं अनेक तरुणांची झाली आहे. क्रोधातून काहीजणांच्या हातून घडणारे गुन्हेही वाढले आहेत...

ITR फार्म भरतांना जेष्ठ नागरिकांनी हे नियम लक्षात ठेवा

 ज्येष्ठ आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी आखून दिलेले महत्त्वाचे नियम समजून घेणे, आवश्यक आहेत. हे नियम समजले तर ज्येष्ठ नागरिकांची लाखो रुपयांची बचत होऊ शकते. लक्षात घ्या की, आयकर विभाग ज्येष्ठ नागरिकांना कर विवरणपत्र भरण्यासाठी एक विशेष प्राप्तिकर रिटर्न (ITR) फॉर्म प्रदान करते. ज्यामध्ये ते कर सूट मिळवू शकतात. हा फॉर्म ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाच्या श्रेणीनुसार आयटीआर फॉर्म भरावा लागतो. आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले पेन्शनधारक कर भरण्यासाठी ITR 1 वापरू शकतात. परंतु मालमत्ता, इतर स्रोत किंवा भांडवली नफा यातून उत्पन्न असणाऱ्यांनी ITR-2 चा पर्याय निवडला पाहिजे. व्यवसायातून कमावणाऱ्या पेन्शनधारकांनी ITR-3 किंवा ITR-4 फॉर्म भरावा. कर मर्यादा -  महत्वाचे म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांना 3 लाख रुपयांची मूलभूत मर्यादा आहे. तर अति ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादा 5 लाख रुपये आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत समाविष्ट असलेल्यांसाठी देखील मूळ मर्यादा 3 लाख रुपये आहे. फॉर्म 16 - ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनच्या स्वरूपात उत्पन्न म...

PM किसान सन्मान निधी योजनेच्या नावाखाली होतोय मोठा फ्रॉड

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पंतप्रधान संबंधी योजनेच्या नावाखाली एक लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नये. असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. ही एक प्रकारची शेतकऱ्यांची फायबर फसवणूक केली जात आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर त्यानंतर शेतकऱ्याचा संपूर्ण मोबाईल आणि सिम कार्ड देखील हॅक होते. समोरील व्यक्ती मोबाईल्स आणि सिम कार्डचा ताबा घेतो. आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.अन्यथा त्यांना मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसू शकतो. सध्या सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. परंतु आता शेतकऱ्यांबाबत देखील घडायला लागलेले आहेत. अशा प्रकारची कोणतीही फसवणूक जर शेतकऱ्यांची झाली असेल, तर त्यांनी 9330 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार दाखल करायची आहे.

जुना फोन विकताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

  आपण एखादा फोन 3 ते 4 वर्षे वापरला असेल तर त्या फोनमध्ये आपले अनेक डॉक्युमेंट्स आणि महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह असतात. फोन विकताना जर ह्या गोष्टी डिलीट केल्या नाही तर तुमच्या डेटा गैरवापर होण्याची शक्यता असते. सध्या अनेक गोष्टी आपल्याला डिजीटली उपलब्ध होतात. आपण कोणतीही डॉक्युमेंट्स सोबत घेऊन फिरण्यापेक्षा केवळ त्या डॉक्युमेंट्सचे फोटो आपल्या फोनमध्ये काढून ठेवतो. जेणेकरून आपण कोठे गेलो आणि आपल्याकडे ते डॉक्युमेंट्स नसेल तरी देखील आपल्या फोनमधील फोटोच्या मदतीने आपण त्या डॉक्युमेंट्सची प्रिंट काढू शकतो. तसेच आपण आपल्या बँकेचे व्यवहार देखील फोनवरून करतो. त्यामुळे एखादा फोन 3 ते 4 वर्षे वापरल्यानंतर त्या फोनमध्ये आपली सर्व माहिती जमा असते. हा फोन दुसऱ्याला विकताना आपण जर ह्या सर्व गोष्टी फोनमधून डिलीट केल्या नाहीत तर आपल्या माहितीचा गैरवापर होऊन आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन फोन खरेदी करण्याची तयारी करत असाल आणि तुमचा जुना फोन विकायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅक्टरी रिसेट. तुम्ही तुमचा फोन ...

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक

इमेज
काही ठिकाणी धमकावून चोरी केली जाते. पण आता अशा घटना उघडकीस येत आहेत, ज्यामध्ये धमकी न देता, कोणतीही जबरदस्ती न करता व्यक्ती आपल्या जवळचे दागिने, पैसे अथवा मौल्यवान वस्तू चोरांना नेऊन देते. तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल, पण हे खरं आहे. बांगलादेशात चोरट्यांनी नवीन पद्धत वापरून लोकांना लुटणं सुरू केलं आहे. यात ते एखाद्या व्यक्तीकडे पत्ता विचारण्यासाठी किंवा इतर कारणाने जातात आणि त्यांच्याकडील सर्व दागिने आणि पैसे लांबवतात. विशेष म्हणजे ती व्यक्तीही आपल्या घरातलं मौल्यवान सामान स्वतः चोरट्यांना देते. चोर ते लुटून किंवा जबरदस्ती करून नेत नाही. चोरटे ज्या औषधाच्या मदतीने अशी गुन्हेगारी कृत्ये करत आहेत, त्याला शैतानी श्वास देखील म्हणतात. फसवणुकीची नवीन पद्धत मागच्या काही काळापासून बांगलादेशमध्ये एका औषधाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करून त्यांना लुटलं जात आहे. ज्यामध्ये कागद किंवा एखाद्या वस्तूवर औषध टाकून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिथून जाणाऱ्या लोकांच्या नाकाजवळ ते नेलं जातं. या वासाने काही सेकंदातच व्यक्तीचे भान हरपते. यानंतर तिच्याकडे ठेवलेले दागिने, पैसे किंवा कोणत्याही वस्तू मागित...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक

'या' गोष्टी गुप्त ठेवा