पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

ऑफिसचा वर्कलोड सहन होत नाहीये? या ४ टिप्स फॉलो करा, टेन्शन होईल दूर

इमेज
हल्ली कामाच्या व्यापामुळे आपल्यापैकी अनेकांना वर्कलोड सहन होत नाही. कामाचा इतका ताण असतो की, जास्त व्यापामुळे आपण स्वत:ची काळजी नीट घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला अधिक ताण सहन करावा लागतो. कामाचा ताळमेळ जुळत नसेल तर आपल्याला अधिक मानसिक त्रास (Mental Stress) होतो. तसेच यामुळे मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. काम (Worked) कसे संपवायचे, मॅनेज कसे करायचे अशा गोष्टी सुरु असतात. तसेच काम लगेच संपवण्याच्या नादात आपण अति घाई केली की ते आणखी उशीरा होण्याची किंवा चुकण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला कामाचा वर्कलोड सहन होत नाहीये तर या ४ टीप्स (Tips) फॉलो करा. 1. वेळेनुसार कामाचे विभाजन तणाव आणि चिंता टाळण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन कौशल्य शिकणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत. त्याचे व्यवस्थित नियोजन करा. घर आणि कामाचे नियोजन कसे करता येईल यावर भर द्या. 2. झोपे घेणे महत्त्वाचे जर कामाच्या अतिरिक्त ताणामुळे तुम्ही व्यवस्थित झोप घेत नसाल तर आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. शरीर दिवसभरातील ताणतणाव आणि दबावापासून स्वत:ला डिटॉक्स करते. त्यासाठी रात्री शांत ८ तासांची झोप घेणे गरज...

'बँक लॉकर'ची सुरक्षा आपल्याच हातात !

इमेज
  'बँक लॉकर'ची सुरक्षा आपल्याच हातात ! आजकाल घरात सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे ठेवणे सुरक्षित राहिले नसल्याने 'बँक लॉकर' भाड्याने घेणे अन् त्यात स्वतःचे दागिने अन् महत्त्वाची कागदपत्रे ठेवणे, ही सामान्य गोष्ट झाली आहे. आपल्या घरापेक्षा 'बँक लॉकर' ही सुरक्षित जागा असली, तरी ती आज १०० टक्के सुरक्षित राहिलेली नाही. जरी बँका या 'लॉकर्स'साठी कडक सुरक्षाव्यवस्था जसे की, २४ घंटे कॅमेरे, 'अलार्म' (धोक्याची घंटा) सुविधा , प्रतिबंधित क्षेत्र इत्यादी उपाय योजत असल्या, तरी आजकाल 'बँक लॉकर' फोडीचे गुन्हे वाढीला लागले आहेत, तसेच अधिकोष कर्मचार्‍यांकडून आपापसांत संगनमताने लॉकरमधील मौल्यवान वस्तू चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आपण कधी या 'बँक लॉकर'च्या सुरक्षेचा विचार केला आहे का ? या लॉकरमध्ये ठेवलेल्या गोष्टी खरच सुरक्षित असतात का ? अशा लॉकर फोडीच्या घटना घडतात, त्या वेळी ग्राहक म्हणून आपण काय करू शकतो ? या चोरीचे उत्तरदायित्व कोण घेते ? या लॉकर्सना काही विमा संरक्षण असते का ? याविषयीची माहिती आज आपण या लेखाद्वारे घेणार आहोत. १. ...

केवायसी घोटाळा म्हणजे काय? फसवणूक होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी?

इमेज
  केवायसी घोटाळा म्हणजे काय? वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक केली जाते. आपले नाव, पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच संबंधित बँकेच्या तपशीलाचा वापर करतात. या माहितीच्या आधारे गैर व्यवहार करतात, अनधिकृत खाती उघडतात आणि खाती हॅक करून त्याचा गैरवापर करतात. स्कॅमर कॉल, इमेलवर बँकिंग अधिकाऱ्यांची नक्कल करून संबंधित व्यक्तींना माहिती विचारतात. याशिवाय मेसेजवर केवायसी अपडेट करण्यासाठी लिंक पाठवतात आणि त्या लिंकवर क्लिक करून अपडेट करण्यास सांगतात. जर आपण त्या लिंकवर क्लिक केले तर आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. केवायसी फसवणूक होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी? वैयक्तिक माहितीविषयी काळजी घ्या – तुमची संवेदनशील माहिती ऑनलाइन किंवा फोनवर शेअर करणे टाळा. अनोळखी कॉलरबरोबर आणि अज्ञात वेबसाइटवर माहिती शेअर करू नका. वैध वित्तीय संस्था क्वचितच तुम्हाला ईमेलवर किंवा फोनवर पिन, पासवर्ड विषयी माहिती विचारतात. डिजिटल व्यवहार सुरक्षित करा – तुमच्या सर्व खात्यांसाठी चांगला आणि कठीण पासवर्ड तयार करा ज्यामुळे तुम्ही सुरक्षितरित्या डिजिटल व्यव्हार करू शकता.शक्य असेल तिथे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करा ज...

मासिक पाळी येण्यास उशीर का होतो? पाळी चुकते? असे का होते? 5 कारणे जाणून घ्या

इमेज
मासिक पाळी नियमित असेल तर त्या महिलेचे आरोग्य सुद्धा चांगले असते. परंतु आजकालचे धकाधकीचे जीवन, त्यात बदलती जीवनशैली, ताण-तणाव या सर्व गोष्टींमुळे मासिक पाळी उशीरा येऊ शकते, बहुतेक वेळेस असे होते की मासिक पाळी सुरू होण्यास उशीर झाल्यास, बहुतेक प्रकरणांमध्ये गर्भधारणेला दोष दिला जातो. तसेच मासिक पाळीला एक किंवा दोन महिन्यांहून अधिक काळ उशीर झाला तर ती अमेनोरियाची समस्या असू शकते . असं डॉक्टर सांगतात. ही समस्या कायम राहिल्यास, स्त्रीरोगतज्ञाला भेट देणे आवश्यक आहे. आता पाळी येण्यास उशीर होण्याची कारणे कोणती आहेत हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. मासिक पाळी सुरू होण्याच्या दिवसापासून पुढच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापर्यंतचा कालावधी एक चक्र मानले जाते. सामान्य कालावधीचे चक्र अंदाजे 28 दिवस असते. एक सामान्य चक्र 38 दिवसांपर्यंत असू शकते. जर तुमची मासिक पाळी यापेक्षा जास्त असेल किंवा सामान्यपेक्षा जास्त असेल, तर तो कालावधी विलंब मानला जातो. वजनात होणारा अत्याधिक बदल, हार्मोनल अनियमितता आणि रजोनिवृत्तीकडे जाणारे चक्र हे देखील यामागचे एक कारण असू शकते.     थायरॉईड याबाबत स्त्रीरोगतज...

केंद्र सरकारच्या पाच योजना

इमेज
  केंद्र आणि राज्य सरकार सामान्य नागरिकांचं जीवन सुलभ व्हावं, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत मिळावी म्हणून अनेक योजना राबवत असते. यातच आज आपण केंद्र सरकारच्या अशाच पाच योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. 1. सुकन्या समृद्धी योजना : पैशांअभावी आपल्या मुलांना शिक्षण देऊ न शकलेल्या कुटुंबांच्या, विशेषत: मुलींच्या चिंता दूर करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली.देशातील मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी जानेवारी 2015 मध्ये बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चासाठी पैसे वाचवू शकता.  सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते त्यांच्या पालकांच्या नावावर उघडले जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खाते उघडू शकता. सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षात मॅच्युर होते. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर या खात्यातून अभ्यासासाठी पैसे काढता येतात. मात्र संपूर्ण रक्कम 21 वर्षानंतरच काढता येते. 2. उज्ज्...

एआय व्हॉईस क्लोन स्कॅम

इमेज
  आजच्या या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता हे मानवी तंत्रज्ञानाचं भवितव्य असले तर या तंत्रज्ञानाचे फक्त फायदेच आहेत असं नाही. सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर एआय तंत्रज्ञान वापरुन, विविध युक्त्या वापरुन माणसांना ठगण्याच्या नव्या कल्पना घेऊन येत आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनीच सतर्क आणि जागरुक असण्याची आवश्यकता आहे. व्हॉइस क्लोनिंग म्हणजे काय? तर, एखाद्याच्या आवाजाची हुबेहूब नक्कल. आज एआय तंत्रज्ञानामुळे अशी नक्कल करणं अतिशय सोपं आहे. वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर्स आणि टूल्स वापरुन एखाद्या व्यक्तीचा हुबेहूब किंवा जवळपास तसाच आवाज तयार करणं शक्य आहे. स्कॅमर आता लोकांची सायबर फसवणूक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा देखील वापर करत आहेत, ज्यामध्ये स्कॅमर तुमच्या मित्राचा, ओळखीचा किंवा नातेवाईकाचा आवाज क्लोन करतात आणि फोन कॉल करतात आणि तुम्हाला मदतीची विनंती करतात. बऱ्याच वेळा तुम्ही घोटाळेबाजांच्या सापळ्यात अडकता आणि फसवणुकीचे बळी ठरता. अशा अनेक बातम्या तुम्ही नुकत्याच वाचल्या किंवा ऐकल्या असतील, ज्यामध्ये अशाच पद्धतीने व्हॉईस क्लोन करून कॉल करण्यात आले आणि मदत मागण्याच्या...

गृहकर्ज घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी पडताळून पहा

इमेज
  आज च्या धावत्या युगात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या स्वप्नातील घर घेण्याचे प्रयत्नात असतो. त्यामुळे स्वप्नातील घरा साठी गृह कर्जाच्या मदतीने घर खरेदी करण्यापूर्वी विचारपुर्वक निर्णय घ्यावा लागतो.  आजच्या डिजिटल युगात अनेक बँका आणि वित्तीय संस्था गृहकर्जाची ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करुन देत आहेत. जर तुम्ही गृहकर्जाच्या मदतीने पहिल्यांदा घर खरेदी करत असाल तर तुम्हाला बँका आणि वित्तीय संस्था व्दारे अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. गृह कर्जाबाबतच्या महत्वाच्या बाबी : सिबिल स्कोअर : कर्जासाठी अर्ज करत असताना तुमचा क्रेडिट स्कोर चांगला आहे का नाही हे तपासा. शक्यतो क्रेडिट स्कोर चांगला असावा ज्यामुळे तुमची विश्वासार्हता वाढते आणि कर्ज मंजूर होण्याचा लवकर मार्ग मोकळा होतो. आपली आर्थिक परिस्थिती :  गृह कर्जाच्या नियमानुसार तुम्हाला अधिक काही डाऊन पेमेंट भरावे लागते हे मालमत्तेच्या एकूण किमतीच्या दहा टक्के ते 25 टक्के असू शकते. त्यामुळे गृह कर्ज (Home Loan) घेतल्यानंतर तुम्हाला मासिक हप्ता सुरू होतो जो दीर्घकाळ चालू राहणार असतो. त्यामुळे आधी तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे तपासा...

आता महाप्रसादाच्या आयोजनासाठी ऑनलाईन परवानगी आवश्यक .

इमेज
अन्न व औषध प्रशासनाचं एक मोठा निर्णय गेल्या काही दिवसांपासून महाप्रसादातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. महाशिवरात्री निमित्ताने देखील अशाप्रकारे भंडारा, महाप्रसादाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येणार असल्याने अन्न व औषध प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रत अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून 200 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. तसेच बुलढाणा  जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर जेवणातून भगर आणि आमटी मुळे अंदाजे 450 ते 500 जणांना या जेवणातून विषबाधा झाली होती. यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. आता महाप्रसादाचे आयोजन करायचे असल्यास त्याबाबतची नियमावली अन्न व औषध प्रशासनाने जारी केली आहे. महाप्रसाद कार्यक्रमासाठी ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक महाप्रसादाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी शंभर रुपये शुल्कासह ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन कर...

वैद्यकीय शिक्षण ते ही निःशुल्क,कुठे? ते जाणून घ्या.

इमेज
आजच्या काळात आपल्या भारतात डॉक्टर होणं सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलं नाही. कारण वैद्यकीय क्षेत्रातील संबंधित शिक्षणचा खर्च दिवसेंदिवस महाग होत आहे. लाखो रुपयांची ट्युशन फी, होस्टेलचा खर्च, अभ्यासक्रमाची पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च हा खूपच मोठा असतो. भारतातमध्ये सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची फी 10 लाख रुपयांपर्यंत आहे. तर, खासगी मेडिकल कॉलेजमध्ये ही फी 60 लाख रुपयांपर्यंत आहे. या शिवाय, शिक्षण पूर्ण होईपर्यंत लागणाऱ्या खर्चाचा हिशेब सहजासहजी करता येणार नाही. पण अमेरिकेतील एका मेडिकल कॉलेज ने तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. ट्युशन फीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून एक रुपया घेणार नसल्याचं कॉलेजनं जाहीर केलंय.  बीबीसीच्या बातमीनुसार, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये हे कॉलेज असून, त्याचे नाव अल्बर्ट आईनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीन आहे. या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी एका विद्यार्थ्याला दरवर्षी 59 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 48 लाख 87 हजार रुपये ट्युशन फी भरावी लागते. अनेक विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेऊन ही फी भर...

रेल्वे ची महिला प्रवाशां च्यां सुरेक्षेसाठी विशेष योजना

इमेज
अनेकदा आपण रेल्वे प्रवास दरम्यान एकट्या महिला सुरक्षित नसल्याचे बघितले असेल पण आता घाबरून जाण्याचे कारण नाही . यातच देशभरात रेल्वे प्रवासा दरम्यान महिला सुरक्षेसाठी मोदी सरकारकडून एक योजना राबविली जात आहे. त्या योजनेचे नाव ‘ मेरी सहेली योजना’ असे असून त्याबाबतची अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मेरी सहेली योजना : या योजनेअंतर्गत रेल्वे प्रवासा दरम्यान कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास मेरी सहेली योजनेअंतर्गत महिला तक्रार करू शकतात. विशेषत: रेल्वेत एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना ही योजना फायद्याची ठरणार आहे. मेरी सहेली योजनेच्या टीममध्ये फक्त महिलांचा समावेश असेल. ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला विशेष सुरक्षा मिळेल. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची काळजी फक्त महिलाच घेतील. ही टीम एकटीने प्रवास करणाऱ्या महिलेला ती कुठे जात आहे? कोणी तिचा छळ करत आहे का? तुम्हाला ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येत आहे का? याबाबतची माहिती विचारु शकते. त्यामुळे आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांना काळजी करण्याची गरज नाही. मेरी सहेली योजना ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलां...

भारतातील लठ्ठपणा ची समस्या

इमेज
आपल्या समाजात अनेक महिला, पुरुष व  मुलं जाड किंवा लठ्ठ आहेत पण लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणं ही तेवढं च अवघड आहे . लठ्ठपणामुळे या सर्वांना इतर अनेक आजारांना सामोरे जावे लागते. भारतात लठ्ठपणा गंभीर आजार आहे. भारतात पंजाब, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये या विकाराचं प्रमाण सर्वाधिक आहे.  आपल्या देशात लठ्ठपणा या विकाराने ग्रासलेल्या भारतीयांची संख्याही लक्षणीय आहे. पाच ते 19 वर्षांच्या 6 कोटी 30 लाख मुलांना लठ्ठपणा हा विकार आहे. 20 वर्षांवरच्या 15 कोटी 80 लाख व्यक्ती लठ्ठ आहेत. केरळमध्ये 65.4 टक्के तर पंजाबमध्ये 62.5 टक्के नागरिकांना लठ्ठपणा हा विकार आहे. दिल्लीत हे प्रमाण 59 टक्के तर एवढं आहे. तमिळनाडूत 57.9 टक्के नागरिक लठ्ठ आहेत. लठ्ठपणाचा संबंध केवळ वजनाशी नसून संपूर्ण आरोग्याशी आहे. लठ्ठ व्यक्तींना अनेक गंभीर आजार असतात किंवा होऊ शकतात. उच्च रक्तदाब, हृदयरोग, श्वसनविकार, मधुमेह, चयापचयाच्या समस्या, तसंच मानसिक विकारही या व्यक्तींमध्ये आढळण्याची शक्यता असते. त्यामुळेच नियमित व्यायाम, चौरस आहार आणि विश्रांती यांचा दिनचर्येत समावेश करणं आवश्यक असल्याच...

२०२४-२५ पासून पाचवी अन् आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याचे बंधन

इमेज
 पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा होते, पण पहिली ते आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही, असे धोरण 'आरटीई' अंतर्गत २०१० पासून सुरू आहे. आता त्यात बदल करण्यात येणार असून पाचवी व आठवीतील विद्याथ्यांना वार्षिक परीक्षा पास व्हावीच लागेल, अन्यथा त्यांना नापास झाल्याने त्याच वर्गात बसावे लागणार आहे. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश काढले आहेत.  शालेय शिक्षण विभागाने 'आरटीई' अॅक्ट लागू करताना पहिली ते आठवीतील सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे २०१० पासून इयत्ता पर्यंत पहिली ते आठवीतील एकही विद्यार्थी नापास झाला नाही. पण, पुढे जाऊन अनेक विद्यार्थी इयत्ता दहावी, बारावीत अभ्यासक्रमात पिछाडीवर राहिले आणि अनेकांनी मधूनच शाळा देखील सोडल्याची उदाहरणे समोर आली.  विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, त्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान असे विषय विस्तृतपणे समजावेत या हेतूने आता इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल. पण, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून त्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेच्या परीक्षेत प...

महिलांना व्यवसायात आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्त्री शक्ती योजना

इमेज
आजचा जमाना हा स्टार्टअपचा आहे. या स्टार्टअपच्या जमान्यात महिलांचाही विविध प्रकारच्या स्टार्टअप्स उभारणीत मोलाचा वाटा आहे. कोणताही व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल हवेच. त्यामुळेच केंद्र सरकारने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅक असलेल्या स्टेट बॅक आँफ इंडियासोबत ‘स्त्री शक्ती योजना’ आणलीय.  महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून स्वत: काहीतरी केले पाहिजे, यासाठीच स्त्री शक्ती पॅकेज योजना सुरू करण्यात आली. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेत महिलांना त्यांचे काम सुरू करण्यासाठी २५ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. जेणेकरून देशातील महिला उद्योजकांची संख्या आणखी वाढेल. महिलांना स्वावलंबी आणि सशक्त करण्यासाठी स्त्री शक्ती पॅकेज योजना सुरू करण्यात आली. जेणेकरून महिला स्वत:चा व्यवसाय सुरू करून पुढे जाऊ शकतील. स्त्री शक्ती पॅकेज योजनेत किती कर्ज उपलब्ध आहे केंद्र सरकार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्त्री शक्ती पॅकेज योजनेअंतर्गत महिला जास्तीत जास्त २५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये बँकेच्या काही निकषांची पूर्तता करावी लागते. त्यात प्रामुख्याने, कर्ज घेणाऱ्या ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना

इमेज
 शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सुधारीत 'एनपीएस' योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूकविषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल, अशी घोषणा करीत, राज्यात १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के इतके निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच निवृत्तीवेतनाच्या ६० टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुधारीत करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव व सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यास अधिकारी, कर्मचारी संघटनेनेही सहमती दर्...

UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? मग पाच गोष्टी लक्षात ठेवा

इमेज
युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) आज केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये वापरला जात आहे. UPI ची सुरुवात भारतातून झाली असली तरी हळूहळू संपूर्ण जग त्याचा स्वीकार करत आहे. UPI सर्वांपर्यंत पोहोचला आहे, पण त्यात अनेक समस्या आहेत. पहिली समस्या म्हणजे पेमेंट अडकणे. अनेकवेळा बँकेचे सर्व्हर डाउन असल्याने तर कधी इंटरनेटमुळे पेमेंट अडकून पडते . आज आम्ही तुम्हाला UPI पेमेंटमधील काही समस्या आणि त्यांच्या उपायांबद्दल सांगणार आहोत.  UPI पेमेंट लिमिट चेक करा  UPI पेमेंट फेल होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे UPI पेमेंट लिमिट पूर्ण होणे हे आहे. हे दोन्ही बाजूंनी होऊ शकते. म्हणजेच जर तुमची पेमेंट मर्यादा देखील पूर्ण झाली असेल तर पेमेंट थांबवले जाऊ शकते. बँक सर्व्हर इश्यू UPI पेमेंट फेल होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे बँक सर्व्हर इश्यू. कोणत्याही बँकेचा सर्व्हर कधीही निकामी होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी, तुमच्या UPI आयडीशी एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट लिंक करून ठेवा. पेमेंट करताना काही अडचण आल्यास, तुम्ही बँक अकाऊंट बदलून लगेच पेमेंट करू शकता. UPI पिन तुम्ही UPI पिन चुकीचा टाकल्यास, पेमेंट अडकू ...

बनवला मून रोव्हर. बिहारच्या या मुलाला नासाने बोलावले चौथ्यांदा, केळीच्या काड्यापासून केली वीज निर्मिती

इमेज
 गोपालजी. वयाच्या 13 व्या वर्षी त्याने केळीच्या काड्यापासून वीज निर्माण करून तरुण शास्त्रज्ञांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आपले नाव नोंदवले आणि आता गोपाल जी आणि त्याच्या टीमची नासासाठी निवड झाली आहे. गोपालजीच्या संस्थेच्या यंग माइंड अँड रिसर्च डेव्हलपमेंटच्या सदस्यांनी मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी रोव्हर तयार केला आहे. तरुण शास्त्रज्ञ गोपाल जी हा मूळचा बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील ध्रुवगंज या छोट्याशा गावचा आहे आणि त्याने अगदी लहान वयातच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. 19 आणि 20 एप्रिल रोजी NASA द्वारे आयोजित ह्युमन एक्सप्लोरेशन रोव्हर चॅलेंज कार्यक्रमासाठी गोपालजीची संस्था आणि त्याच्या टीमची निवड झाली आहे. शास्त्रज्ञ गोपालजीची टीम आता नासाला जाणार आहे. तरुण शास्त्रज्ञ गोपाल जी आणि त्याच्या टीमने चंद्रावर उतरण्यासाठी मानवी रोव्हर तयार केला आहे, जो नासामध्ये सादर केला जाईल. हा रोव्हर बनवण्यासाठी 10 लाख रुपये खर्च आला. जगातील हायस्कूल स्तरावरून 30 संघ निवडले गेले आहेत. यापैकी एक संघ गोपालजीचा आहे. बिहारचा 22 वर्षीय गोपाल जी या संघात मार्गदर्शक असेल....

ज्येष्ठ नागरिकांना मोफत मिळणार श्रवणयंत्र, व्हीलचेअर आणि बरच काही.; सरकारच्या 'या' योजनेसाठी लवकर करा अर्ज

इमेज
केंद्र सरकारने वृद्धांना आधार देण्यासाठी एक योजना सुरू केली आहे. वृद्धांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ज्यात त्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना वृद्धापकाळात शारीरिक अपंगत्व आले आहे. ज्यांना बघायला, ऐकायला आणि चालायला आधार लागतो. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांची आवश्यकता असते. अशा वृद्धांसाठी सरकार ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ राबवत आहे. या योजनेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्हालाही राष्ट्रीय वयोश्री योजना बद्दल माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल सांगणार आहोत. ही योजना काय आहे आणि कोणत्या वर्गातील ज्येष्ठांना या योजनेचा लाभ मिळेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि तुम्ही अर्ज कसा करू शकता याबद्दलची माहिती सांगणार आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना 2017 मध्ये सुरू झाली : केंद्र सरकारने 1 एप्रिल 2017 रोजी देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरू केली. – तेव्हापासून या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना दिला जात आहे. ही योजना केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केली आहे. - ज्याची सुरुवात आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून झाली...

तुम्हाला बोटं मोडण्याची सवय आहे का? आत्ताच सोडा, अन्यथा वाढेल 'या' आजाराचा धोका!

इमेज
घरात लहान मुलं बोटं मोडत असतील तर मोठी माणसं त्यांना 'अशी बोटं मोडू नयेत, ही चांगली सवय नाही,' अशी सक्त ताकीद देतात. बऱ्याचदा बोटं मोडणं म्हणजे एखाद्याचं वाईट चिंतणं असं मानलं जातं. त्यामुळे लहान मुलांना बोटं मोडताना मोठी माणसं ओरडतात. पण बोटं मोडणं ही सवय चांगली नाही, असं डॉक्टर्स मानतात. इतकंच नाही तर या संदर्भात संशोधनं झाली असून, त्यातही ही सवय वाईट असल्याचंच म्हटलं आहे.  काही जणांना वारंवार बोटं मोडण्याची सवय असते. काहीजण सवयीमुळे वारंवार बोटं मोडतात, तर काही जण मात्र कंटाळा आला किंवा फावल्या वेळात हाताची बोट मोडताना दिसतात. बोटं मोडल्यानंतर काहींना अत्यंत आरामदायी वाटतं. पण ही सवय चांगली नाही, कारण यामुळे हाडांचं नुकसान होतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. डॉक्टरांच्या मते, वारंवार बोटं मोडल्याने हाडांवर त्याचे वाईट परिणाम होतात. यामुळे हाडं कमकुवत होऊ शकतात आणि काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे बोटं मोडण्याची सवय सोडून द्यायला हवी. आपल्या बोटांच्या, गुडघ्यांच्या आणि कोपराच्या सांध्यांमध्ये एक खास लिक्विड असतं. याचं नाव Synovial...

'अशी' काळजी घेतली तरच ई-बाईक बॅटरी टिकेल

इमेज
पेट्रोलचे दर (Petrol Price) गगनाला भिडले आहेत. दुसऱ्या बाजूला पर्यावरण संवर्धनासाठी 'ई-बाईक्स'चा वापर गेल्या काही वर्षांत वाढला आहे. मिरज औद्योगिक वसाहतीतील योगटेक कंपनीचे (Yogtech Company) संचालक चिन्मय गोरे यांनी सांगितलेली माहिती अशी की, श्री. गोरे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी. बी. टेक. नंतर त्यांनी एमबीए केले. त्यानंतर त्यांनी प्राधान्याने बॅटरीविषयी अभ्यास सुरू केला. त्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये त्यांनी मिरज औद्योगिक वसाहतीत योगटेक नावाची कंपनी सुरू केली. बॅटरी बनवणारी पश्‍चिम महाराष्ट्रातील ही एकमेव कंपनी आहे. दुचाकीसाठी लागणाऱ्या बॅटरींविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ''इलेक्ट्रिक दुचाकीत आता शासनाच्या नियमानुसार लिथियम-आयनच्या बॅटरी वापरल्या जातात. त्या कमी जागा व्यापणाऱ्या व वजनाने हलक्या असतात. त्यामुळे त्यांचा वापर केला जातो. शासनाने 'एआयएस-१५६' निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार ही बॅटरी बनवली जाते.  त्याचे साधारणतः सात ते आठ वर्षे आयुष्य असते. वेळच्या वेळी देखभाल केली तर बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होते. साधारणत...

SBI Credit Card वापरकर्त्यासाठी महत्वाची बातमी, कार्डच्या नियमांमध्ये झाले हे बदल

इमेज
खिशात पैसे नसतील आणि अचानक पैशांची गरज भासली की अनेकजण क्रेडिट कार्ड वापरतात. पैशांची कमतरता असताना एखादी वस्तू ताबडतोब विकत घ्यायची गरज पडल्यास किंवा अचानक पैशांची गरज भासल्यास सर्वात आधी आपण क्रेडिट कार्डचा विचार आपण करतो. अचानक येणाऱ्या खर्चाला तोंड देण्यासाठी क्रेडिट कार्ड खूप फायदेशीर ठरते.  परंतु कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड वापरताना आपण त्या क्रेडिट कार्डचे नियमही लक्षात ठेवले पाहिजेत. आता अलीकडेच भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांक बदल केले आहेत. एसबीआयचे हे नवीन नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहेत . त्यामुळे तुम्हीही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला या नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. SBI ने क्रेडिट कार्डच्या नियमांत केले हे बदल किमान रक्कम : आता तुमच्या क्रेडिट कार्डवरील किमान रक्कम खालीलप्रमाणे मोजली जाईल - एकूण GST + EMI रक्कम + 100% फीस आणि चार्ज + 5% वित्त शुल्क + किरकोळ खर्च / रोख पैसे काढण्याची रक्कम + ओव्हरलिमिट रक्कम. हा नियम 15 मार्च 2024 पासून लागू होणार आहे. भाड्यावर रिवॉर्ड : पूर्वी तुम्हाला एसबीआ...

१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी! विद्युत वितरण कंपनीत ५ हजारहून अधिक जागांसाठी मेगा भरती सुरू

इमेज
 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत ५३४७ पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया विद्युत सहाय्यक पदासाठी आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. हा अर्ज कसा भरायचा, अर्ज भरण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, पगार याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि विशेषत: १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. ज्यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत काम करायची इच्छा आहे, त्यांनी आजच अर्ज करा. पदाचे नाव - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदासाठी अर्ज मागविले आहे. पदसंख्या - विद्युत सहाय्यक पदासाठी एकूण ५३४७ जागा रिक्त आहेत. खालील प्रमाणे या रिक्त जागांचे विभाजन करण्यात आले आहेत. अनुसूचित जाती – ६७३ अनुसूचित जमाती – ४९१ विमुक्त जाती (अ)- १५० भटक्या जाती (ब) – १४५ भटक्या जाती (क) – १९६ भटक्या जाती (ड) – १०८ विशेष मागास प्रवर्ग – १०८ इतर मागास प्रवर्ग – ८९५ ईडब्ल्यूएस – ५०० अराखीव – २०८१ वयोमर्यादा - पात्र उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे असावे. शैक्षणिक ...

चक्षू पोर्टलमुळे सायबर गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई होईल

इमेज
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सायबर गुन्हेगार पोहोचू नयेत यासाठी सरकारने चक्षू पोर्टल आणले आहे. या Cyber crime पोर्टलवर संशयास्पद कॉल्स आणि नको असलेल्या कॉल्सच्या तक्रारी केल्या जाऊ शकतात, यानंतर सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर आता तात्काळ कारवाई होणार, अशी माहिती दूरसंचार विभागाचे उपमहासंचालक राजेंद्र मेश्राम यांनी दिली. केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते चक्षू आणि डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म चक्षूचा लाँचिंग कार्यक्रम नवी दिल्ली येथे ऑनाइन पध्दतीने झाला.  दूरसंचार विभागाने चक्षू हे नवीन पोर्टल आज लाँचिंग केले असून दूरसंचार नेटवर्कमधील फसवणुकीबाबत ग्राहक थेट तक्रार करू शकतील. हे पोर्टल सुरू झाल्यामुळे संशयास्पद कॉल किंवा मेसेज आल्यास या पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवू शकता. मुख्यत: डिजिटल जगात वेगाने वाढणारे सायबर गुन्हे थांबवण्यासाठी सातत्याने नवनवीन नियम लागू केल्या जात आहे. दूरसंचार नेटवर्कवरील फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकार संचार साथी पोर्टलवर 'चक्षू' हे पोर्टल सुरू केल्यामुळे Cyber crime सायबर फसवणुकीवर नियंत्रण आणता ...

महिलांचा आरोग्य विमा काढणे का आवश्यक आहे?

इमेज
  आपण अशा काळात जगत आहोत जिथे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाते आणि चर्चा केली जाते. स्तनाचा कर्करोग, ऑस्टिओपोरोसिस आणि गरोदरपणातील समस्यांसारखे आजार गंभीरपणे लक्ष देण्याची आणि दर्जेदार आरोग्यसेवेची मागणी करतात. महिला आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात असल्या तरी आज त्यांच्या सर्वांगीण विकासासोबत आरोग्याची काळजी घेण्याची जास्त गरज आहे. या 'जागतिक महिला दिनानिमित्त' (International Women's Day )आज आपण महिलांसाठी 'आरोग्य विमा'का महत्त्वाचा आहे ते जाणून घेणार आहोत. आरोग्य विमा का काढला पाहिजे? हेल्थ पॉलिसी किंवा आरोग्य विमा गंभीर आजार झाल्यास रुग्णालयाच्या खर्चाची पूर्तता करण्यास मदत करते. वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी नैराश्य आणि अनेक आर्थिक समस्यांपासून ते तुम्हाला वाचवते. म्हणजेच हेल्थ पॉलिसी किंवा आरोग्य विमा तुम्हाला अडचणीच्या काळात मदत करू शकते. यामुळे तुम्हाला कोणतेही महागडे उपचार घेण्यासाठी आर्थिक बळजबरीचा सामना करावा लागणार नाही. वाढती महागाई आणि गंभीर आरोग्य समस्यांशी संबंधित सेवा पाहता, कोणत्याही कुटुंबासाठी हेल्थ पॉलिस...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक

'या' गोष्टी गुप्त ठेवा