पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डिजिटल अरेस्ट करून लाखोंची फसवणूक, तुम्हीही 'ही' काळजी घ्या अन्यथा...

सध्या 'डिजिटल अरेस्ट' ही सायबर फसवणुकीची नवी पद्धत समोर आली आहे.   डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन माध्यमातून धमकी दिली जाते की त्याला सरकारी एजन्सीने अटक केली आहे आणि त्याला दंड भरावा लागेल. यानंतर लोकांकडे पैशांची मागणी केली जाते व त्यांची फसवणूक केली जाते. डिजिटल अरेस्टबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही. गुन्हेगारांच्या अशाप्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे यशस्वी होत नाहीत. मात्र डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पे थांबा/शांत राहा विचार करा योग्य कारवाई करा असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा,  घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका,  तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा.  दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही.  तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून...

उत्तम झोपेवर परिणाम करणारे घटक

उत्तम झोपेवर परिणाम करणारे घटक आजच्या बदललेल्या वेगवान जीवनशैलीत आहार, व्यायाम, करमणुकीची साधने, ध्वनीप्रदूषण, ताणतणाव अशा बदलांमुळे बहुसंख्यांच्या झोपेवर परिणाम झाले आहेत. आहारामधील जंकफूड, कॅफीनयुक्त पेये, एनर्जी ड्रिंक्स, चहा-कॉफीचे वाढते प्रमाण, पार्ट्या-समारंभांमध्ये आणि मित्रमैत्रीणींसोबतच्या भोजन समारंभांमध्ये होणारे अतिरिक्त मद्यपान या सगळ्यामुळे उत्तम झोप येण्यावर मर्यादा आल्या आहेत. कामाचे तास अनिर्बंध झाल्यामुळे व्यायामाला वेळ मिळत नाही. ऑफिसमध्ये येण्या-जाण्यासाठी आणि फिरण्यासाठी वाहनेच वापरल्यामुळे जवळच्या अंतरावर चालत जाण्याची शारीरिक हालचाल टाळली जाते. जिन्यांवरील चढउतार टाळण्यासाठी लिफ्ट आणि सरकते जिने वापरले जातात. शरीराची हालचाल मर्यादित झाल्यामुळे, शारीरिक थकव्यामुळे 'झोप येणे' हा अनुभव येणे संपुष्टात आले आहे. दैनंदिन व्यवहारात आणि करमणुकीच्या साधनांमध्ये संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची रेलचेल आहे. मोबाईल फोन, टेलिव्हिजन, संगणक, लॅपटॉप, टॅब्ज यांचा वापर छोट्या मुलांपासून जख्ख वृद्धांपर्यंत सर्रास होत आहे. या उपकरणांमधील किरणोत्सर्गाचा परिणाम शरीरात झोप आ...

मॅटर्निटी इन्शुरन्स म्हणजे काय?

इमेज
आजकाल कोणती समस्या कधी उद्भवेल काहीही सांगू शकत नाही. त्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास ऐनवेळी हॉस्पिटल आणि दवाखाने पाठी लागतात. अशावेळी पैशांसाठी मोठी धावपळ लागते. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत नेमका किती पैसा लागेल याची काहीही शाश्वती नसते. अशावेळी आरोग्य विमा मोठी महत्वाची भूमिका पार पडतो. अचानक उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्येसाठी आरोग्य विमा मोठा फायदेशीर ठरतो. मॅटर्निटी इन्शुरन्स म्हणजे काय? (Maternity Insurance) मॅटर्निटी इन्शुरन्स म्हणजे 'मातृत्व विमा'. हा एक आरोग्य विम्याचा प्रकार आहे. हा विमा अनेक आरोग्य विमा देणाऱ्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिला जातो. जो महिलांच्या प्रसुतीच्या अगोदरचा आणि प्रसूतीनंतरचा खर्च काढण्यासाठी मदत करतो. काही कार्पोरेट कंपन्यासुद्धा आरोग्य विमा योजनांमधून महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसूती काळातील खर्चासाठी हा विमा प्रदान करतात. हा विमा एक ॲड ऑन इन्शुरन्स असतो. ज्याला तुम्ही सामान्य आरोग्य विम्यासोबतसुद्धा घेऊ शकता. मॅटर्निटी इन्शुरन्सचे फायदे महिलांच्या प्रसूती कालावधीतील खर्चासाठी हा विमा अत्यंत फायदेशीर ठरतो. प्रसूती कालावधीत येणारा ख...

'या' व्यक्तीनी पपयी खाणे आजच बंद करा

इमेज
किडनी स्टोन ज्या व्यक्तींना किडनी स्टोन आहे अशा व्यक्तींनी पपयी खाऊ नये, असा सल्ला डॉक्टर देखील देतात. पपयीमध्ये व्हिटॅमीन सी असतं. किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी पपयी खाल्ल्याने त्यांचा किडनी स्टोन आणखी वाढण्याची शक्यात असते. यासह पपयीमध्ये कॅल्शियम ऑक्सालेट देखील असते. अशावेळी तुम्हाला किडनी फेल होण्याची समस्या देखील होऊ शकते. गर्भवती महिला गर्भवती महिलांसाठी पपयी फार घातक आहे. कदाचीत त्याने बाळाच्या जिवाला देखील धोका होऊ शकतो. पपयी खाल्ल्याने यूटेरस कॉन्ट्रेक्शन सुरु होऊ शकतं. काही प्रकरणात पपयीचे सेवन केल्याने त्या महिलेची प्रसुती वेळेआधीच होण्याची शक्यता असते. असे झाल्यास बाळाची वाढ पूर्ण झालेली नसते. त्यामुळे बाळासह मातेच्या जीवाला धोका निर्माण होतो. हृदयविकाराने ग्रस्त व्यक्ती ज्या नागरिकांना हृदयाशीसंबंधीत आजार आहेत त्यांच्यासाठी देखील पपयी काही प्रमाणात घातक मानली जाते. पपयीत असे काही घटक असतात ज्याने हृदयाचा आजार असल्यास हृदयाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी सावधानतेने पपयी खाणे टाळले पाहिजे.

एक वर्षाच्या आतील मुलांना 'हे' पदार्थ देऊ नयेत

बाळासाठी सहा महिन्यानंतरचा आहार हा नवीन असतो. त्यामुळे नवीन चव म्हणून मुलं तुम्ही देईल खात पित असतात. पण त्यांची पचनशक्ती पूर्ण विकसित झालेली नसते. यामुळे बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याला कोणत्या गोष्टी खायला देऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे.कारण काही पदार्थ पचवणे त्यांना कठीण जाते त्यामुळे मुलांना उलट्या जुलाब होऊ लागतात. यामुळे त्यांना काय खाण्यास द्यावे यापेक्षा का देऊ नये हे लक्षात घ्यावे. गायीचे दूध गायीचे दूध हे आपल्या आरोग्यासाठी वरदान आहे. याचे अनेक आरोगयदायी फायदे आहेत. पण मुलांच्या बाबतीत मात्र गायीचे दूध अपेक्षित परिणाम देऊ शकत नाही. कारण गायीच्या दूधात प्रथिने असतात. पण जर मुलाचे वय एक वर्षापेक्षा कमी असेल. तर हे दूध पचवणे मुलाच्या पचनसंस्थेसाठी कठीण काम असते. त्यामुळे मुलाला पोट फुगणे, पोटदुखी आणि गॅस सारख्या समस्यांचा त्रास होतो. चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत चॉकलेट सगळ्यांना आवडतं. पण लहान बाळाला चॉकलेट देऊ नये. पण एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना चॉकलेट खाऊ घातल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. आंबट फळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण व्हिटॅमिन सी समृद्ध आंबट फळ खातो. पण ...

विलायती चिंचे पासून प्रक्रियायुक्त पदार्थ

इमेज
विलायती चिंचेची लागवड प्रामुख्याने राजस्थानमधील अजमेर, उदयपूर आणि माउंट अबू जिल्ह्यात आहे. फळांमधील गर लाल आणि पांढऱ्या रंगाचा असतो. बिया काळ्या रंगाच्या असतात. या चिंचेला सामान्यतः पहाडी चिंच म्हणून ओळखले जाते. हे झाड सदाहरित असून, वीस मीटर उंचीपर्यंत वाढते. प्रत्येक शेंगेमध्ये सुमारे दहा बिया असतात. विलायती चिंचेमध्ये आवश्यक पोषक तत्त्वेदेखील असतात. हे फळ अतिसारावर उपचार, दात मजबुतीकरण आणि मधुमेह असलेल्यांमध्ये रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. विलायती चिंचेमध्ये ऊर्जेची गरज, भूक नियंत्रण आणि शरीरातील अन्नाचे पचन सुधारण्यासाठी कॅलरी, प्रथिने, जटिल कर्बोदके आणि आहारातील तंतू असतात. कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोह मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जीवनसत्त्व क आणि ब उपलब्ध आहे. याचबरोबरीने अँटिऑक्सिडन्ट, फिनोलिक संयुगे, फ्लेव्होनॉइड्स आणि क्वेरसेटीन उपलब्ध आहे. यामध्ये प्रथिने, सॅपोनिन्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनॉलसारखी फायटोकेमिकल्स उपलब्ध आहेत. पौष्टिक घटक  १) कर्बोदके -७६.८७ ग्रॅम २) प्रथिने -१२.४ ग्रॅम ३) तंतुमय घटक - १.३ ग्रॅम ४) चरबी - ०.२४ ग्रॅम ५) पोटॅशिअम - ०.२ ग...

इंस्टंट नूडल्स खाण्याचे साइड इफेक्ट्स

इमेज
  इंस्टंट नूडल्स खाण्याचे साइड इफेक्ट्स  हाई सोडियम कंटेंट : इन्स्टंट नूडल्समध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात सोडियम सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो, हृदयविकार, पक्षाघात आणि किडनी रोगाचा धोका वाढू शकतो. अनहेल्दी फॅट : इन्स्टंट नूडल्समध्ये बऱ्याचदा अस्वास्थ्यकर फॅट्स असतात, जसे की सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स. या चरबीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. कमी पोषण : इन्स्टंट नूडल्समध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासारख्या पोषक तत्वांचा अभाव असतो. या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता, थकवा आणि पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. मोनोसोडियम ग्लुटामेट : काही इन्स्टंट नूडल्समध्ये MSG असते, ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि मळमळ यासारखी लक्षणे दिसू शकतात. प्रोसेस्ड फूड: इन्स्टंट नूडल्स हे प्रोसेस्ड फूड असल्यामुळे या खाद्यपदार्थांमध्ये अनेकदा रसायने, प्रिझर्व्हेटिव्ह आणि कृत्रिम फ्लेवर्स असतात, ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. लठ्ठपणा : इन्स्टंट नूडल्समध्ये कॅलरी आणि फॅट जास्त असते, ज्यामुळे वजन वाढू शकते आणि लठ्ठपणा...

चांदीचे दागिने वापरण्याचे शास्त्रीय फायदे

इमेज
उष्णतेचा त्रास कमी होतो चांदी थंड असते, त्यामुळे चांदीचे दागिने घातल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. ज्या व्यक्तींना उष्णतेचा खूप त्रास होतो, त्यांच्यासाठी चांदी खूप फायदेशीर ठरू शकते, शिवाय यामुळे आपले संपूर्ण आरोग्यदेखील चांगले राहण्यास मदत होऊ शकते. त्वचा चमकदार होते चांदीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यादेखील कमी होतात. तसेच चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मदेखील असतात, जे त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करू शकतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढते चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून आपल्याला दूर ठेऊ शकतात. राग नियंत्रणात राहतो चांदीचे दागिने वापरल्याने व्यक्तीचे मन शांत राहते; ज्यामुळे तणाव, चिंता आणि रागही नियंत्रणात राहतो. तसेच यामुळे झोपही चांगली लागू शकते. चांदीचे दागिने केवळ महिलांसाठीच नाही, तर पुरुषांसाठीदेखील तितकेच फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं, यात तुम्ही चांदीची चैन, अंगठी, ब्रेसलेट, कडा यांचा वापर करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसा...

वजन कमी करण्यासाठी वॉकिंग की पायर्‍या चढणं, नेमका कुठला व्यायाम आपल्यासाठी योग्य आहे

इमेज
 पायर्‍या चढताना कमी वेळात जास्त कॅलरी बर्न   होण्यास मदत होते. जास्त कॅलरीज बर्न होण्यासाठी या व्यायामांचा रोजच्या रुटिनमध्ये समावेश करणे गरजेचे. एकाच वेळी दोन पायर्‍या चढल्यानेही फायदा होतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हा वजन कमी करण्याचा मार्ग आहे. पायर्‍या चढण्यामुळे तुमच्या पायाचे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. त्याशिवाय ग्लुटस् आणि कोर स्नायू मजबूत होतात. ग्लुटस् आणि कोर स्नायू मजबूत होतात. स्नायू बळकट झाल्यामुळे बेसल चयापचय दर वाढण्यास फायदा मिळतो. वॉकिंगपेक्षा पायर्‍या चढताना तुमच्या लक्षात आलं असेल, यावेळी तुमचे हृदय गतीने वाढतं. अशात पायर्‍या चढताना कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. पायर्‍या चढण्याचा व्यायाम हे प्रत्येकासाठी उपयुक्त नाही. ज्या लोकांना गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल त्यांनी पायर्‍या चढण्याचा व्यायाम करू नये. पायर्‍या चढणे आणि चालणे हे दोन्ही वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला व्यायाम मानला गेला आहे. 

गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यातील फलश्रुती

इमेज
श्री गुरुचरित्र सात दिवसांत वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या ५३ अध्याय पोथीतील क्रम असा आहे. सप्ताह पद्धती १ ला दिवस :- १ ते ९ अध्याय २ रा दिवस :- १० ते २१ अध्याय ३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय ४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय ५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय ६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय ७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय अध्याय १- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय २- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय३- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते. अध्याय ४- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय ५- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय ६- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते. अध्याय ७- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय ८- बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते. अध्याय ९- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय १०- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो. अध्याय ११- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते. अध्याय १२- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय १३- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात...

मूत्रपिंडाच्या आजारांशी निगडित चाचण्या

इमेज
शरीराचे कार्य सुरळीतपणे सुरू राहावे यासाठी मूत्रपिंड म्हणजे किडनी हा अवयव फारच महत्त्वाचा असतो. मूत्रपिंड शरीर संतुलित राखण्याचे कार्य करतो. सुदृढ शरीरासाठी मूत्रपिंडाचे दैनंदिन कार्यही सुरळीत राहायला हवे.   मूत्रपिंडाचे विकार जडत असताना शरीरात सौम्य लक्षणेही आढळून येत नाही. रुग्णाला असह्य वेदना होऊ लागल्या तोपर्यंत मूत्रपिंडाचचा आजार जीवघेणा ठरलेला असतो. या आजाराचे वेळीच निदान होणे आव्हानात्मक ठरते. वयाची तिशी पूर्ण होताच मूत्रपिंडाच्या आजारांशी निगडित सर्व चाचण्या कराव्यात जेणेकरून निदान आणि औषधोपचार सुरु करता येतील. रक्तदाब तपासणी  उच्च रक्तदाब मूत्रपिंड विकाराचे मूळ कारण समजले जाते. शरीरातील रक्तदाब ठराविक कालांतराने तपासायला हवे. तुम्ही न चुकता रक्तदाब तपासत राहिलात तर उच्च रक्तदाबाची सुरुवात होताच या जीवघेण्या आजाराची कल्पना येते. उच्च रक्तदाबाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवले नाही तर दीर्घकालीन मूत्रपिंड विकाराचा धोका संभवतो. बरेचदा मूत्रपिंड निकामी होते. सिरम क्रिएटिन तपासणी  सिरम क्रिएटिन हा मांसपेशींमधील दूषित पदार्थ मानला जातो. ...

कोणत्या वेळेत वर्कआउट करावा?

इमेज
हेल्दी राहण्यासाठी वर्कआऊट अतिशय महत्त्वाचंआहे, हे आपण रोजच ऐकत असतो. कारण आपल्यापैकी अनेकजण फिटनेस फ्रिक असाल. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न देखील केले जातात. फिट राहण्यासाठी कोणत्या वेळेतला (सकाळ किंवा संध्याकाळ) वर्कआउट जास्त फायदेशीर ठरतो. याकरता आम्ही एक्सपर्टचा सल्ला घेतला की, कोणत्या वेळेचा वर्कआऊट अधिक फायदेशीर ठरतो. मॉर्निग वर्कआऊट का फायदेशीर? मॉर्निंग वर्कआईट चयापचय वाढवते आणि मूड देखील सुधारतो? यासोबतच झोपेची गुणवत्ताही सुधारते. एक्सपर्ट सांगतात की, एखाद्या व्यक्तीने आपल्या आरोग्यासाठी आणि जीवनशैलीसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी शरीराचे संकेत ऐकले पाहिजेत. तुम्हाला दोन्ही वेळेला वर्कआऊट केल्यानंतर शरीरात होणारे बदल ओळखता आले पाहिजेत. सकाळचा व्यायाम केल्याने मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर बाहेर पडतात. हे मनाला तीक्ष्ण करण्यास आणि इंद्रियांना सक्रिय करण्यास मदत करते आणि अनेक विकासात्मक कार्यांमध्ये उपयुक्त भूमिका बजावते. एवढेच नाही तर सकाळी व्यायाम केल्याने शरीर दिवसभर सक्रिय राहते. सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने संध्याकाळच्या तुलनेत जास्त चरबी बर्न होते. कारण शरीरात...

बीपी तपासण्याची योग्य पद्धत काय आहे

इमेज
  बदलेली जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण यामुळे रक्तदाबाची समस्या सासत्याने वाढत आहेत. महिला असो वा पुरुष किंवा तरुण असो वा ज्येष्ठ नागरिक उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाची समस्या यांच्यामध्ये दिसून येत आहे. बीपी तपासण्याची योग्य पद्धत काय आहे याबद्दल नवी दिल्ली सर गंगा राम हॉस्पिटलच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस विभागाच्या संचालिका डॉ. सोनिया रावत यांनी बीपी तपासण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. डॉ. सोनिया रावत सांगता की, प्रौढांचा सामान्य रक्तदाब 120/80 मिमी एचजी एवढा असतो. त्या म्हणाल्या की, सिस्टोलिक दाब 120 मिमी एचजीपर्यंत आणि डायस्टोलिक दाब 80 मिमी एचजीपर्यंत असायला हवा. यापेक्षा जास्त किंवा कमी असल्यास त्या व्यक्तीला उच्च आणि कमी रक्तदाबाची समस्या असते. बीपीचा त्रास असल्याना सतत तो तपासत राहावा लागतो. त्यात कमी जास्त प्रमाण झाल्यास डॉक्टरांचा संपर्क करावा.  बीपी तपासण्याची योग्य पद्धत काय आहे? डॉक्टर सोनिया रावत यांनी बीपी तपासण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. त्या म्हणतात की, बीपी तपासताना आरामात खुर्चीवर बसणे ही योग्य पद्धत आहे. खुर्चीवर बसताना तुमचे पाय जमिनीवर असले...

सवयी बदलाचे तंत्र

इमेज
बहुतेक वेळ कोणतीही सवय माणसाला जडते, तेव्हा ती अचानक सुरू झालेली असते. कुणाचं तरी पाहून, कुणाच्या सहवासात राहून, कुणाला तरी आदर्श मानून किंवा काही कारण नसतानाही एखादी सवय लागलेली असते. जेव्हा एखादी सवय सोडायची असेल तर मूळ कारण जाणून घ्या. आता सवयी बदलण्यासाठी नेमक्या काय कृती करायच्या ते बघू या. १) नोट डाऊन करणे व प्रतिदिन पाहणे. बरेचदा काही गोष्टी नुसत्या मनातच ठरवून चालत नाही. त्या 'नोट डाऊन' कराव्या लागतात. म्हणून एखाद्या सवयीबद्दल तुमचा प्लॅन काय आहे, तो एका कागदावर लिहा. म्हणजे 'वजन कमी करणं' हे तुमचं ध्येय असेल तर व्यायामाची सवय लावून घ्यायला हवी. ती कशी आणि काय प्रकाराची आहे, किंवा किती दिवसात हे ध्येय साध्य करायचं आहे, हे कागदावर स्पष्ट लिहून काढा. वाईट सवय सोडून नवी चांगली सवय लावायची असेल, तर काय 'नको' आणि काय 'हवं' ते डिटेल लिहिले पाहिजे. तसेच रोज त्यावर नजर टाकली पाहिजे. २) सवयीला उत्तेजित करणार्‍या गोष्टीं पासून दूर राहायचं. काही लोक, काही जागा किंवा अजून काही ज्यामुळे ट्रिगर पॉईंट येतो. उत्तेजना मिळते त्यापासून लांब राहायचं. समजा, एखाद्या म...

रियल इस्टेट अथवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल व भविष्यकाळात चांगला परतावा मिळवायचा असेल तर

इमेज
काही वर्षांपासूनचा विचार केला तर रियल इस्टेट म्हणजेच प्रॉपर्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा ट्रेंड आपल्याला वाढताना दिसून येत आहे. तुम्हाला जर रियल इस्टेट अथवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल व भविष्यकाळात चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्हाला अशी प्रॉपर्टी खरेदी करण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. नाहीतर नफा मिळण्याऐवजी तोटा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून निवासी किंवा व्यावसायिक मालमत्तेची खरेदी करत असाल तर काही मूलभूत गोष्टी पाहणे गरजेचे आहे. 1- चांगल्या ठिकाणच्या मालमत्तेची खरेदी करणे– तुम्हाला जर घर किंवा दुकान, प्लॉट खरेदी करायचा असेल तर तो योग्य ठिकाणी असणे गरजेचे आहे. जर सदर मालमत्ता चांगल्या आणि योग्य ठिकाणी असेल तरच त्याच्या किमतीत काळानुरूप वाढ होत असते. एखाद्या झोपडपट्टीच्या जवळ प्रॉपर्टी खरेदी करणे टाळा. तसेच तुम्ही अशा प्रकारचे मालमत्ता घेत असाल त्या ठिकाण पासून हॉस्पिटल, शाळा आणि बाजारपेठ यासारखे महत्त्वाची ठिकाणे किती अंतरावर आहेत याची देखील खात्री करा. तसेच तुम्हाला ज्या परिसरामध्ये अशी मालमत्ता वि...

रक्तातील साखरेची ( High Blood Sugar Control Tips) पातळी अचानक वाढली तर ती नियंत्रित करण्यासाठी काही चार सोप्या गोष्टी

 रक्तातील साखरेची ( High Blood Sugar Control Tips) पातळी अचानक वाढली तर ती नियंत्रित करण्यासाठी काही चार सोप्या गोष्टी सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. 1) जर रक्तातील साखर झपाट्याने वाढते, तर जास्त पाणी पिणे सुरू करा.अतिरिक्त ग्लुकोजपासून मुक्त होण्यास मदत करते, जे साखर नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच, शरीरातील हायड्रेशनची पातळी वाढवून, साखरेची पातळी सामान्य केली जाऊ शकते. 2) रक्तातील साखरेची पातळी लवकर कमी करण्यासाठी व्यायाम हा देखील एक चांगला मार्ग आहे. या कालावधीत, अतिरिक्त ग्लुकोजचा योग्य वापर केला जातो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्या छोट्या व्यायामाचीही मदत घेऊ शकता. 3) फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासही खूप मदत होते. आम्ही तुम्हाला सांगतो की यामुळे चयापचय वाढतो आणि साखरेची पातळी कमी होऊ लागते. 4) रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास कारल्याचा किंवा जामुनचा रस पिणेही फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे इन्सुलिन नियंत्रणात येण्यास मदत होते. ग्लायकोसाइड जॅम्बोलिन आणि अल्कलॉइड जॅम्बो सीन विशेषतः ब्...

प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी या गोष्टींचा आहारात समावेश करा

इमेज
 शरीरात प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा डेंग्यूसारख्या धोकादायक आजारामुळे ही समस्या उद्भवते. अशी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत जी प्लेटलेट्स वेगाने वाढवण्यास मदत करतात. प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी या गोष्टींचा आहारात समावेश करा प्लेटलेटची संख्या झपाट्याने वाढवण्यासाठी तुम्ही जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले पदार्थ खावेत. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी खाऊ शकता ते जाणून घेऊया- गिलॉय   गिलॉय हे आयुर्वेदिक औषध आहे. हे प्लेटलेट संख्या वाढविण्यात मदत करू शकते. तुम्ही गिलॉय पाण्यात उकळून प्या. पपईच्या पानांचा अर्क प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईची पाने फायदेशीर ठरू शकतात. या पानांमध्ये एंजाइम असतात जे शरीरातील प्लेटलेटची संख्या वाढवतात. यासाठी पपईची पाने धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. यानंतर, ते गाळून त्याचा रस काढा आणि त्याचे सेवन करा.  व्हीटग्रास व्हीटग्रासमध्ये अमीनो ॲसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी तुम्ही व्हीटग्रास खाऊ शकता. यासाठी व्हीटग्रास ज्यूस तुम्ही घरीच बनव...

नैसर्गीक प्रसूतीसाठी सायन मॉडेल

 अलिकडे सर्वत्र सिझेरीयन प्रसुतींची संख्या वाढत चालली आहे. मात्र नैसर्गीक प्रसूती व्हावी, अशी इच्छा सर्वांची असते. प्रसूती कळा सहन करण्याची क्षमता नसणे किंवा जोखीम नको म्हणून सिझेरीयनचा पर्याय स्वीकारण्याचा कल बहुतांश जोडप्यांचा असतो; मात्र आता सायन रुग्णालयाने नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी एक मॉडेल तयार केले आहे. या मॉडेलच्या अंमलबजवणीमुळे सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण कमी होत आहे. तर नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण ७५ ते ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. डॉ. निरंजन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सायन मॉडेल तयार केले आहे. काय आहे मॉडेल मुख्य सी-सेक्शन दर लक्षणीयरित्या कमी करण्यात मदत करते. गर्भवतीच्या मांडीवर २४ फ्रेंच फॉलीज कॅथेटर लावला जातो. ते गर्भाशयाच्या प्रवेशद्वारावर जोडले जाते. त्यानंतर कॅथेटरचा दबाव वाढवल्याने प्रवेशद्वार प्रसरण पावते. यामुळे बाळ बाहेर यायला मदत होते. या पद्धतीने प्रसूतीची प्रक्रिया पार पाडली जाते; मात्र या पद्धतीत गर्भवतीतेला तीव्र वेदना होतात. तसेच सिझेरीयनमुळे महिलेला भविष्यात त्रास होतो. सायन मॉडेल हे कॅलिफोर्निया मॅटर्नल क्वालिटी केअर कोलॅबोरेटिव्ह जर्नलमध्ये प्रका...

हट्टी मुलांना हाताळायचं कसं?

इमेज
 मुलांच्या विकासासाठी मग तो शारीरिक असो किंवा मानसिक त्यांना पालकांकडून प्रेम, काळजी, संरक्षण, वेळ, त्यांनी केलेली प्रशंसा, कौतुक अशा गोष्टी हव्या असतात. जर वेळच्या वेळी या गोष्टी पालकांकडून मुलांना दिल्या जात असतील तर मुलांचं भावविश्व स्थिरावलेलं असतं. पण या गरजा जर पूर्ण होत नसतील आणि मुलं हट्ट करत असतील तर ती धोक्याची घंटा मानायला हवी. मुलांनी वयाप्रमाणे हट्ट करणं यात चुकीचं काहीच नाही. पण टोकाचा हट्ट मुलांनी करणं, पालकांना तो हट्ट पुरवता न येणं, यामुळे पालकांचा आरडाओरडा आणि मुलांची रडारड असं चित्र अनेकदा बघायला मिळतं. अशा हट्टी मुलांशी कसं वागायचं? त्यांच्याशी डील कसं करायचं हे अनेकदा पालकांच्या लक्षात येत नाही आणि मग मुलांच्या हट्टाला बळी पडून किंवा चारचौघांमध्ये होणारी शोभा टाळण्यासाठी मुलांचे हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अनेक पालकांनाही हाच प्रश्न पडतो की हट्टी मुलांना हाताळायचं कसं? मुलं टोकाची हट्टी असली की पालकांचाही रागाचा पारा चढतो. पालकांना वाटते की आपला आवाज वाढवला तर मूल दबेल. पण होतं उलटंच. हट्टी मुलं पेटून उठतात. पालकांना जे समजून सांगायचं ते बाजूलाच राहातं आ...

बायोसेन्सिंग उपकरण

इमेज
 कॅन्सर, हृदयरोग, डायबेटीस रुग्णांवरील उपचार सहजसोपे व्हावेत, यासाठी गोरखपूर विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापक डॉ. तुलिका मिश्रा यांनी एक अनोखे उपकरण तयार केले आहे. ' बायोसेन्सिंग ' असे या उपकरणाचे नाव आहे. या संशोधनाला नुकतेच ब्रिटनचे पेटंट मिळाले आहे. डॉ. तुलिका मिश्रा या दीनदयाल उपाध्याय गोरखपूर विद्यापीठात वनस्पती विज्ञान विभागात सहायक प्राध्यापक आहेत. सध्याच्या काळात लोकांची जीवनशैली बदलली आहे. त्याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. कॅन्सर, हदयरोग, मधुमेह याचे रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांवरील उपचारात उपयोगी पडेल, असे उपकरण डॉ. तुलिका मिश्रा यांनी तयार केलेय. रुग्णांना कोणती औषधे द्यायची आणि कधी द्यायची, हे ठरवण्याची क्षमता या अनोख्या उपकरणात असेल. तसेच हृदयरोगाशी संबंधित आजारांची माहितीही सहजरीत्या मिळेल. डॉ. तुलिका मिश्रा यांच्या संशोधनावर ब्रिटनेही पेटंट देऊन मोहोर उमटवली आहे. कसे केले संशोधन मागील पाच वर्षांपासून डॉ. तुलिका मिश्रा यांनी विविध राज्यांतील नऊ संशोधकांसमवेत मोबाईल सेन्सिंग डिव्हाईसवर काम सुरू केले होते. वेगवेगळय़ा आजारांसाठी औषधीय वनस्पतींवर प्रयोग करत हे...

पोटात जंत कशामुळे होतात? लक्षणे व उपाय

इमेज
  पोटात जंत कशामुळे होतात? अनेक लोकं जेवताना स्वच्छतेची काळजी घेत नाही. तसेच जेवण बनवताना देखील स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे पोटात जंत होतात. जे शरीरात विविध आजार उद्भवतात. अशा परिस्थितीत स्वच्छता राखणे आवश्यक आहे. लहान मुलांना सर्वात जास्त जंताची समस्या होण्याचे कारण म्हणजे, ते मातीच्या तसेच अनेक अस्वच्छ वस्तूंच्या संपर्कात येतात. ज्यामुळे त्यांचे हात अस्वच्छ होतात, याच अस्वच्छ हाताने जेवल्यामुळे त्यांना जंताचा त्रास होतो. काहीवेळा पोटात जंत झाल्याचे कळून येत नाही. त्यामुळे ही काही लक्षणे आढळून आल्यास जंतावर वेळीच उपचार घेता येऊ शकतात.  लक्षणे   पोटदुखी जर तुम्हाला वारंवार पोटदुखी होत असेल तर ते पोटदुखीचे लक्षण असू शकते. अशा स्थितीत काहीही खाल्ल्यानंतर अनेकांना पोट दुखू लागते. उलट्या होणे आणि मळमळ होणे पोटातील जंतांमुळे उलट्या आणि मळमळ होऊ शकते. तुम्हालाही अशा समस्या वारंवार येत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. गुदाशय मध्ये खाज सुटणे पोटात जंत असल्यास, गुदाशयात खाज येण्याची समस्या असू शकते. विशेषत: खाज येण्याची समस्या रात्रीच्या वेळी अधिक सत...

आंबा खरेदी करताना गोड व रसाळ कसा ओळखावा?

इमेज
कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यामुळे आंबे घेताना आपण काळजीपूर्वक आणि पारखून घेणे खूप गरजेचे आहे.  कृत्रिमरीत्या पिकवणारे आंबे हे कॅल्शियम कार्बोइडच्या माध्यमातून पिकवतात. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर कच्चे आंबे विकत घेतले, आणि घरी आणून ते वाळलेले गवत, पालापाचोळा, झाडांची पाने, वर्तमानपत्रांच्या कागदामध्ये ठेवले, तर ते आंबे घरच्या घरी पिकवता येतात. रंगापेक्षा सालीवरून ओळखा जेव्हा केव्हा तुम्ही आंबा खरेदी करता, तेव्हा त्याच्या रंगापेक्षा सालीकडे जास्त लक्ष द्या. जर तो आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला असेल, तर त्या आंब्याच्या सालीवर एकही डाग नसतो . परंतु तो आंबा जर नैसर्गिकरित्या पिकवलेला नसेल, तर त्यावर काळे डाग दिसतात. त्यामुळे रंगावरून योग्य आंबा ओळखता येतो. देठांवरून आंबा ओळखा तुम्ही घेतलेला आंबा हा गोड आहे. हे त्याच्या देठावरून ओळखू शकता. यासाठी आंबा खरेदी करताना त्याचा देठाचा भाग नीट तपासा. दाब दिल्यास किंवा बाकीचा भाग फुगीर आणि मऊ असल्यास आंबा पूर्णपणे पिकलेला आहे आणि ताजा गोड असतो. वासावरून ओळखा आंबा खरेदी करण्याप...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Making Pancard just got easy - check out how ?

'सैतानी श्वास' असं औषध ज्याचा वास घेताच पैसे, दागिणे सगळं देऊन टाकतात लोक

'या' गोष्टी गुप्त ठेवा